एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

जनतेच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा संघर्षाचा जाज्वल्य दीपस्तंभ कर्मयोगी बच्चुभाऊ कडू यांना वाढदिवसानिमित्त विनम्र अभिवादन

जनतेच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा संघर्षाचा जाज्वल्य दीपस्तंभ कर्मयोगी बच्चुभाऊ कडू यांना वाढदिवसानिमित्त विनम्र अभिवादन

मुख्य संपादक संतोष लांडे

सत्ता, पद आणि प्रतिष्ठेच्या मोहापेक्षा जनतेचे अश्रू पुसणे अधिक महत्त्वाचे मानणारे, शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, बेरोजगार, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे, महाराष्ट्राच्या राजकारणातील अजातशत्रू, स्वाभिमानी, प्रामाणिक, निष्ठावान आणि दूरदृष्टीचे लोकनेते म्हणजे आदरणीय माजी राज्यमंत्री कर्मयोगी बच्चुभाऊ कडू.
राजकारण हे सत्तेचे नव्हे, तर समाजसेवेचे माध्यम असते, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले. जनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी लाठीमार, आंदोलन, अटक आणि संघर्ष यांची पर्वा न करता आयुष्यभर लढणारा हा नेता आजही सामान्य माणसाच्या विश्वासाचा आधार आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा असोत, दिव्यांगांचे प्रश्न असोत किंवा दुर्लक्षित घटकांच्या न्यायाचा लढा असो—बच्चुभाऊ कडू यांनी प्रत्येक वेळी निर्भीडपणे आवाज बुलंद केला.
आजच्या स्वार्थी आणि सत्ताकेंद्री राजकारणात तत्त्व, प्रामाणिकपणा आणि जनतेशी असलेली नाळ जपणारे नेतृत्व दुर्मिळ झाले आहे. अशा काळात बच्चुभाऊ कडू यांचे कार्य हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचा संघर्ष हा केवळ राजकीय प्रवास नसून, तो सामाजिक परिवर्तनाचा आणि जनतेच्या स्वाभिमानाचा इतिहास आहे.
परमेश्वर त्यांना निरोगी, दीर्घायुषी जीवन देवो, त्यांच्या हातून शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेची सेवा अशीच अखंड घडत राहो, हीच वाढदिवसानिमित्त सदिच्छा.
आदरणीय कर्मयोगी, लोकनेते, संघर्षयोद्धा बच्चुभाऊ कडू साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक, हार्दिक आणि शिवमय कोटी कोटी शुभेच्छा!
शुभेच्छुक :
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज टीम संपादक संतोष लांडे

अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना राज्य संघटक

 

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link