प्रतिनिधी गोपाळ भालेराव
दारेफळ ता. वसमत. जिल्हा. हिंगोली येथे विजेचा लपंडाव.
आज रोजी कमीत कमी आठ ते दहा दिवस झाले दारेफळ येथे विज नसून प्रत्येक जण परेशान आहे न जनावरांना पाणी आहे ना माणसांना पाणी आहे या हट्टा येथील विज वितरण कंपनी दुर्लक्ष करत आहे.
दारेफळ गावातील ह्या विजेच्या लपंडावामुळे गावातील नागरिक व लहान मुलांच्या आरोग्यावर वितरित परिणाम होतं असून. येथील नागरिकांना असे वाटते की आम्ही स्वतंत्र भारतात आहोत की परतंत्र भारतात राहत आहोत.
एम. एस. बी. सी. संपर्क. केला असता. तिकडून उडवा -उडवीची उत्तरे मिळत असून. अपुरा कर्मचारी वर्ग आहे म्हणून सांगितलं जाते.








