जनावरांची चोरी करणाऱ्या आरोपींच्या टेम्पो सह पोलिसांनी आवळल्या मुसक्या; 400000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; पेठ बीड पोलिसांची कामगिरी!
प्रतिनिधी संगीता ईनकर
पेठ बीड पोलीसांनी जनावरे चोरणा-या तिघांना अटक करुन त्यांच्या ताब्यातून 15000 रुपये किंमतीचे एक गोवंशीय गो-हे व 400000 / रुपये किंमतीचे बोलेरो पिकअप केले जप्त
दिनांक 20/04/2026 रोजी पोलीस निरीक्षक श्री. मारुती खेडकर हे स्टाफ सह सरकारी वाहनाने पोस्टे पेठ बीड हददीमध्ये पेट्रोलींग करत असताना मोबाईलवर माहीती मिळाली की, जी. एन. फक्शन हॉल जवळ जनावरे चोरणारे लोक व पिकअप टेम्पो पकडला लोकांनी पकडला आहे. अशी माहीती मिळताच पोलीस निरीक्षक खेडकर यांनी त्यांचे सोबत असणारे स्टाफ सह मिळालेल्या माहीतीच्या ठिकाणी गेले व आणखी स्टाफ पोलीस स्टेशनमधुन बोलावुन घेवुन जनावरे चोरणारे लोक व त्यांच्या ताब्यातील बोलेरो पिकअप क्र.एम.एच.23 ए.यु. 1015 असलेले व त्यामध्ये असणारे गोवंशीय जातीचे गो-हे त्याचे चारही पाय कास-याने क्रूरपणे बांधलेले मिळुन आले ते पोलीस ठाणे पेठ बीड येथे आणुन सदर आरोपी यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सदरचे गो-हे हे कत्तल करण्यासाठी चोरुन नेत असल्याचे सांगीतले. त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे 1. अशीम जाफर कुरेशी रा. महमदीया कॉलनी 2. अजिम आझाद कुरेशी रा. महमदीया कॉलनी 3. कुरेशी शहनवाज कुरेशी एजाज रा. कुरेशी मोहल्ला पेठ बीड असे सांगुन त्यांनी चोरीचा गुन्हा केल्याचे कबुल केल्याने फिर्यादी सईद अब्दुल करीम कुरेशी वय 51 वर्षे रा. मोमीनपुरा यांच्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन पेठ बीड गु.र.नं. 116/2026 कलम 303 (2),3(5) बीएनएस सह (5)11 5 (अ) 8 महा. प्रणी संरक्षण अधि. 1976 प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर आरोपी यांचे ताब्यातुन 4,15,000/ रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करुन त्यांची पुढील तपासकामी पोलीस कोठडी घेण्यात येवुन पोलीस हवालदार माने पुढील तपास करत आहेत.
सदरची कारवाई ही मा. पोलिस अधिक्षक श्री. नवनीत काँवत साहेब, अपर पोलिस अधिक्षक श्री. सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. वेंकटराम भा.पो.से यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, पोलीस उपनिरीक्षक मन्सुर शहा, पोहेका / 1353 सुभाष मोठे, पोह/1065 नितीश माने पोलीस नाईक /1835 अजित शिकेतोड, पोलिस कॉस्टेबल/2218 विष्णु गुजर, पोशि/1987 गिरी. पोशि/1551 अशोक परझने पोशि/2146 शिवाजी राख यांनी या गुन्हयातील आरोपी यांना तात्काळ ताब्यात घेतले व सदर गुन्हयात अटक केले आहे.








