दिवसा घरफोडी चोरी करणारा आरोपीतास पोयनाड पोलीस ठाणेकडून अटक
प्रतिनिधी रणजीत मस्के
पोलीस ठाणे पोयनाड
श्रीमती आँचल दलाल, भा. पो. से. पोलीस अधीक्षक, रायगड श्री. अभिजित शिवथरे, म.पो. से. अपर पोलीस अधीक्षक रायगड श्री. जालिंदर नालकुल, उपविभागिय पोलीस अधिकारी, पेण विभाग
तपास अधिकारी व पथक
सुजित गडदे, सहायक पोलीस निरीक्षक, पोयनाड पोलीस ठाणे. १) पोहवा /२३८५ सुरेश वाघमारे, २) चालक सहा. फौजदार गायकवाड
गुन्हयाची थोडक्यात हकिगत
यांतील फिर्यादी व इतर साक्षीदार हे मौजे भाकरवड येथील नरेंद शांताराम पाटील यांचे चाळीमध्ये ता. अलिाबाग भाड्याने राहण्यास आहेत. दिनांक १८/०४/२०२६ रोजी सकाळी ८-०० ते १८-०० वाजण्याचे दरम्यान कोणतरी अज्ञात इसमाने फिर्यादी व साक्षीदार यांचे घराची स्लायडींग खिडकीचा लॉक उचकटुन घरात प्रवेश करून फिर्यादी कुंदनकुमार जितेंद्र सिंग वय ३३ वर्षे सध्या रा.भाकरवाड, ता. अलिबाग मुळ रा. बिहार व ४ साक्षीदार यांचे ६५,०००/- रूपयांचे एकुण ५ मोबाईल फोन व ३०००/-रूपयांची रोख रक्कम असे एकुण ६८,०००/- रूपयांचा मुद्देमाल स्वतःचे फायदयाकरीता घरफोडी चोरी करून नेला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासाचा थोडक्यात वृत्तांत/केलेली कार्यवाही
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ तांत्रिक तपास करून सदरील गुहा हा रेकॉर्ड वरिल आरोपीत नामे अनिल किसन राठोड वय २४ वर्ष, रा.शास्त्री नगर अलिबाग, ता. अलिबाग यांनी केला असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर नमुद रेकॉर्ड वरिल आरोपीत बांस गुन्हयाचेकामी ताब्यात घेवुन अटक करण्यात आली व त्याचेकडून गुन्हयातील चोरीस गेलेला संपूर्ण ६८,०००/- रूपयांचे मोबाईल फोन व रोख रक्कम तसेच आरोपीत याने गुहा करणेकरता वापरलेली मोटार सायकल MH 06 CN 2301 असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून १२ तासाचे आत पोयनाड पोलीसांकडुन गुन्हयातील आरोपीतांना अटक करून चोरीस गेलेला सर्व ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपीत याची गुन्हे कार्यपध्दती
रेकॉर्ड वरिल आरोपीत नामे अनिल किसन राठोड वय २४ वर्ष, रा. शास्त्री नगर अलिबाग, ता. अलिबाग हा कंपनी कामगार राहत असलेल्या चाळींना हेरून दिवसा कामगार कामावर गेल्यानंतर स्लायडींग खिडकीच्या फटीमध्ये स्कू ड्रायव्हर घालुन कोणतीही तोडफोड न करता खिडकी उघडून त्यावाटे घरामध्ये प्रवेश करून दिवसा घरफोडी चोरी करून निघुन जायचा. नमुद रेकॉर्ड वरिल आरोपीत याने दारूच्या व्यसनाकरीता पैशांची गरज भागविण्यासाठी घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदरील आरोपीत हा रेकॉर्ड वरिल गुन्हेगार असुन यापुर्वी त्याचेविरूध्द रेवदंडा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ९०/२०१८ भा.द.वि.सं. कलम ४५४, ३८० प्रमाणे
पोयनाड पोलीस ठाणे








