एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

कोयत्याचा धाक दाखवुन हायवे वर जबरी चोरी करणा-या दोन सराईत गुन्हेगारांचा पोलीसांनी २४ तासात छडा लावुन आवळल्या मुसक्या

न-हे पोलीस स्टेशन व युनिट ३ गुन्हे शाखा, पुणे शहर

कोयत्याचा धाक दाखवुन हायवे वर जबरी चोरी करणा-या दोन सराईत गुन्हेगारांचा पोलीसांनी २४ तासात छडा लावुन आवळल्या मुसक्या

प्रतिनिधी रणजीत मस्के

नन्हे पोलीस स्टेशन गु.र.नं. १९/२०२६ भा.न्या.सं.क. ३०९ (४),३ (५) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपींचा दि.१५/०४/२०२६ रोजी किरण लिटे पोलीस उप-निरीक्षक, विजयसिंह घाडगे पोलीस उप-निरीक्षक व पोलीस अंमलदार प्रणिल मेस्त्री, चव्हाण, कोंडे, चव्हाण, मोरडे, तसेच युनीट ०३ चे सहा. पोलीस निरीक्षक ढवळे, पोलीस अंमलदार किशोर शिंदे, कैलास लिम्हण, पुरुषोतम गुन्ला, योगेश झेंडे असे न-हे पोलीस स्टेशनचे हद्दीत आरोपींचा शोध घेत असताना गुन्ह्यातील संशयीत आरोपी हे दोघे स्वामी नारायण मंदीर मागील गेट जवळील बंद मंगल कार्यालय येथील मोकळ्या जागेत थांबले असल्याची गोपनीय माहीती बातमीदाराकडुन मिळाल्याने न-हे पोलीस स्टेशनकडील पोलीस उप-निरीक्षक किरण लिटे, पोलीस उप-निरीक्षक विजयसिंह घाडगे तपास पथकामधील पोलीस अंमलदार, गुन्हे शाखा युनीट ३ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे सदर ठिकाणी तपास केला असता सदर ठिकाणाहून दोन इसम मिळुन आले त्यांना ताब्यात घेवुन त्यांना त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) यश सतिश खवले वय. २० वर्ष रा.प्लॅट नं ४०३ स्वस्तीक पार्क सोसायटी व्हीजन स्कुल जवळ न-हे पुणे २)) ऋषिकेश उध्दव लाखे वय २० वर्ष रा. प्लॅट नं २१२ साई व्हिला सोसायटी अभिनव कॉलेज समोर वाल्हेकर चौक न-हे पुणे असे सांगीतले. त्याचेकडे सदर गुन्ह्यांचे अनुषंगाने अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केलेथे कबुल केले. तसेच सदर गुन्ह्यांचे तपासा दरम्यान त्यांच्याकडुन २,००,०००/-रु. रोख रक्कम, एक ज्युपीटर मोपेड दुचाकी, एक लोखंडी कोयता व एक अॅप्पल कंपनीचा मोबाईल ३७,५००/- रु. किं. चा असा मिळुन एकूण ३,०७,६००/- रु. कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाचा अधिक तपास किरण लिटे पोलीस उपनिरीक्षक न-हे पोलीस स्टेशन पुणे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा.पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ३, पुणे शहर श्री. संभाजी कदम, मा. सहा पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग पुणे शहर श्री. अजय परमार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक न-हे पोलीस स्टेशन श्री. आसाराम शेटे, श्री. प्रशांत अन्नछत्रे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, युनिट ३ यांचे सुचनांप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस उप-निरीक्षक किरण लिटे, पोलीस उप-निरीक्षक विजयसिंह घाडगे, पोलीस अमंलदार निलेश भोरडे, देवा चव्हाण, सुनील चव्हाण, कार्तिक कोंडे, प्रणिल मेस्त्री, तसेच युनिट ३ चे पोलीस अमंलदार किशोर शिंदे, कैलास लिम्हण, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे यांचे पथकाने संयुक्तरित्या केली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link