एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीत धाडसी चोरी; शेतकरी महिलेकडील दागिने हिसकावून चोर फरार.

:
शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीत धाडसी चोरी; शेतकरी महिलेकडील दागिने हिसकावून चोर फरार.

उपसंपादक :- गणेश महाडिक.

दिनांक १९/०४/२०२६ रविवार रोजी संध्याकाळी ७ वाजता
शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत धाडसी चोरीची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जेजुरी– बेल्हे महामार्गावरील पोस्टमन वस्ती परिसरात ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, एक शेतकरी महिला आपल्या घरी जात असताना अचानक मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी तिचा पाठलाग केला. संधी साधत त्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले आणि क्षणार्धात पसार झाले. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.
या घटनेमुळे नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link