सोलापूर प्रतिनिधी. जयसिंग मस्के
दिंनाक, 16 एप्रिल 2026
सध्या, उन्हाची तीव्रता वाढली असून अशा परिस्थितीत, अक्कलकोट ,सारख्या शहरात बस स्थानक परिसरात गर्दीच्या ठिकाणी, येथील सामाजिक कार्यकर्ते. वसंत देढे या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी स्वखर्चातून गर्दीच्या भागात शुद्ध थंड पाण्याची व्यवस्था करून पाणपोई सारखे सामाजिक उपक्रम राबले असल्याचे त्यांचे कार्य कौतुकास्पद कार्य आहे
या पाणपोई ला …
कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक. सुनील फुलारी साहेब यांनी व राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे
या पाणपोईचा उपक्रम अनेक वर्षापासून आज पर्यंत उन्हाळ्यामध्ये त्याची कायम परंपरा त्यांनी ठेवले आहे
त्यांच्या या कार्याचे कौतुक अक्कलकोट परिसरातील नागरिकातून होत आहे








