अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
भ्रष्ट मंत्र्यांविरोधात महाराष्ट्रात जनतेचा ज्वालामुखी धगधगला
संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेनेच्या हाकेला प्रतिसाद देत ठीक-ठिकाणी प्रचंड जनआक्रोश आंदोलन उसळले.
रस्ते-चौक संतापाने भरले, घोषणांनी आकाश दणाणले, आणि महाराष्ट्र प्रेमी जनता सरकारच्या नाकर्तेपणा विरोधात आक्रमकपणे उभी राहिली.
या राज्यव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून नवी मुंबईतही वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौल येथे आज रोष प्रकट झाला.
छत्रपती शिवाजी महाराज चौक,वाशी येथे समस्त पदाधिकारी,कार्यकर्ते आणि शिवसैनिकांनी सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात जोरदार घोषणा बाजी करत आंदोलन पुकारले.
मी सुद्धा ह्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आणि जनतेचा आवाज अधिक बुलंद केला.
“भ्रष्टाचार करणाऱ्यांना गादीवर बसू देणार नाही! जनता उठली आहे, लढा निर्णायक आहे!”
आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे —कलंकित मंत्र्यांना घरी बसवा!”ही केवळ मागणी नाही, तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा हक्काचा लढा आहे
आता जनता गप्प बसणार नाही असे सांगण्यात आले
