अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, रुग्णालयामध्ये फळ वाटप व अनाथाश्रम मध्ये खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न,
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्या वतीने पुणे कॅम्प येथे वृक्षारोपण करण्यात आले, तसेच पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सरदार वल्लभभाई पटेल जनरल रुग्णालय मध्ये रुग्णांना फळ वाटप करण्यात आले, व अनाथ आश्रम मध्ये खाऊ वाटप करण्यात आले, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष सुभाष जगताप, अक्रूर कुदळे, व प्रदीप देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण रुग्णांना फळ वाटप यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नरेश इंद्रसेन जाधव यांनी केले,
या कार्यक्रमाला पुणे कॅन्टोन्मेंट कार्याध्यक्ष राहुल तांबे, ब्लॉक अध्यक्ष दिनेश अर्धाळकर, दिनेश परदेशी, रो शनारा कुरेशी, हरीश लडकत, महेंद्र लालबिगे, अयाज शेख, शब्बीर शेख, ईस्त्याक बागवान, चेतन मोरे, सुनिता बडेकर, दीपक मस्के, वाहिद बियाबानी, फरदीन पाटील, आदि यावेळी उपस्थित होते,
