एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

थेपडे विद्यालयात रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे ‘जागर’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

थेपडे विद्यालयात रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे ‘जागर’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

_विद्यार्थिनींमध्ये आरोग्यविषयक जागरूकता, आत्मविश्वास आणि स्वसंरक्षणाचे महत्त्व अधोरेखित_

समाधान पाटील उत्तर महाराष्ट्र विभागीय संपादक

म्हसावद : स्वा. सै. पं. ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, म्हसावद, ता. जि. जळगाव येथे नवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या वतीने इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी ‘जागर’ या विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे, किशोरवयातील शारीरिक व मानसिक बदलांची माहिती देणे, आत्मविश्वास वाढविणे तसेच स्वसंरक्षणाचे महत्त्व पटवून देणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

 

‘जागरूकता… आत्मविश्वासाची… उज्ज्वल उद्याच्या दिशेने…!’ या प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमातून विद्यार्थिनींना त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर योग्य मार्गदर्शन मिळाले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री. जी. डी. बच्छाव सर होते. मंचावर विद्यालयाचे उपप्राचार्य श्री. के. पी. पाटील सर पर्यवेक्षक श्री एस जे पवार सर तसेच ज्येष्ठ शिक्षिका सौ अनिता नवे मॅडम उपस्थित होत्या. रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचे अध्यक्ष रोटेरियन मा. श्री. योगेश राका आणि सौ.गरिमा राका यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

 

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून श्रीमती सरिता काबरा यांनी ‘जागर’ उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. किशोरवयीन मुलींना त्यांच्या वयात होणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदलांविषयी शास्त्रीय माहिती मिळणे आवश्यक आहे. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि त्या स्वतःच्या आरोग्याबाबत तसेच सुरक्षिततेबाबत अधिक जागरूक होतात, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पाच महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये किशोरवयातील हार्मोनल बदल, वैयक्तिक स्वच्छता (पर्सनल हायजिन), मानसिक स्वास्थ्य (मेंटल फिटनेस), सामाजिक जाणीव व नागरी शिस्त (सिविक सेन्स) आणि स्वसंरक्षण (सेल्फ डिफेन्स) या विषयांचा समावेश होता.

किशोरवयात मुलींच्या शरीरात होणारे नैसर्गिक बदल, त्या बदलांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची आवश्यकता आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व, आरोग्यदायी सवयी आणि दैनंदिन जीवनात स्वच्छता राखण्याची गरज याविषयीही विद्यार्थिनींना माहिती देण्यात आली.

मानसिक स्वास्थ्याच्या संदर्भात ताणतणावाचे व्यवस्थापन, भावनांवर नियंत्रण, सकारात्मक विचारसरणी आणि आत्मविश्वासाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तसेच सामाजिक वर्तन, सार्वजनिक ठिकाणी पाळावयाची शिस्त, इतरांविषयी आदर आणि जबाबदार नागरिक म्हणून वागण्याचे महत्त्व विद्यार्थिनींना समजावून सांगण्यात आले.

डॉ. सोनल इंगळे विद्यार्थिनींशी संवाद साधत आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. किशोरवयीन मुलींनी आरोग्याविषयी जागरूक राहावे, मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले.

तसेच डॉ. अर्चना काबरा यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना स्वसंरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे, प्रसंगावधान राखणे, आत्मविश्वासाने परिस्थितीचा सामना करणे आणि गरज पडल्यास योग्य मदत घेणे याविषयी त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थिनींना केवळ माहिती देण्यापुरते मार्गदर्शन मर्यादित न ठेवता त्यांच्या मनातील प्रश्न मोकळेपणाने मांडण्याची संधी देण्यात आली. डॉक्टरांनी विद्यार्थिनींशी सुसंवाद साधल्यामुळे त्यांना आरोग्य, स्वच्छता, मानसिक स्वास्थ्य आणि वैयक्तिक सुरक्षितता या विषयांबाबत अधिक स्पष्ट माहिती मिळाली.

विद्यालयाचे प्राचार्य श्री. जी. डी. बच्छाव सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या उपक्रमातून विद्यार्थिनींच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासासाठी अशा मार्गदर्शनपर कार्यक्रमांची आवश्यकता अधोरेखित झाली. रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टने आयोजित केलेला हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरला.

विद्यार्थिनींनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, आत्मविश्वासाने पुढे जावे, सामाजिक भान जपावे आणि स्वतःच्या सुरक्षिततेबाबत सदैव जागरूक राहावे, हा महत्त्वपूर्ण संदेश ‘जागर’ कार्यक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री एस जे पवार सर यांनी केले होते. व आभार सौ अनिता नेवे मॅडम यांनी मानले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link