श्री क्षेत्र कपिलधार येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर; तब्बल ३१२१ भाविकांची आरोग्य तपासणी!
प्रतिनिधी माहलिंग स्वामी
संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामी यात्रा महोत्सव २०२६ निमित्त पार्वती हेल्थ फाऊंडेशन व उमा महेश्वर मन्मथ ज्योत समितीचा स्तुत्य सामाजिक उपक्रम; हजारो भाविकांना मोफत औषधोपचारांचा लाभ
कपिलधार : संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामी यात्रा महोत्सव २०२६ च्या निमित्ताने श्री क्षेत्र कपिलधार येथे भक्ती आणि समाजसेवेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. पार्वती हेल्थ फाऊंडेशन, उमरखेड आणि उमा महेश्वर मन्मथ ज्योत समिती, विडूळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत सर्वरोग तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल ३१२१ भाविकांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार देण्यात आले.
डॉ. विष्णुकांत शिवणकर (संचालक, पार्वती चॅरिटेबल हॉस्पिटल, उमरखेड) यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सावन स्वामी बेंडके, संतोष बिचेवार आणि रत्नाकर स्वामी पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा आरोग्यसेवेचा उपक्रम पार पडला. शिबिराचे उद्घाटन प.पू. १०८ श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज, गुरुबुद्धीस्वामी मठ संस्थान, पूर्णा आणि डॉ. सुमित कंठाळे यांच्या हस्ते करण्यात आले.







