एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

स्व. प्रदीप पुर्णेकर यांना न्याय मिळवून देण्यासाठी डोंबिवलीत भव्य कॅन्डल मार्च!

स्व. प्रदीप पुर्णेकर यांना न्याय मिळवून देण्यासाठी डोंबिवलीत भव्य कॅन्डल मार्च!

विशेष प्रतिनिधी मुकुंद मोरे

काल डोंबिवली येथे स्व. प्रदीप पुर्णेकर यांच्या न्यायासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते इंदिरा गांधी चौक दरम्यान भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला.

या मोर्चात कोळी, आगरी भूमिपुत्र तसेच स्थानिक नागरिक अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त केल्या. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्का (MCOCA) अंतर्गत कठोर कारवाई करावी आणि दोषींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी तीव्र मागणी यावेळी करण्यात आली.
न्याय आता केवळ सत्ताधाऱ्यांच्या मर्जीपुरताच मर्यादित राहिला आहे का? एखादे प्रकरण शांत होईपर्यंत सरकारने मौन बाळगायचे आणि न्यायाची मागणी दुर्लक्षित करायची, हीच भूमिका दिसत आहे.

सत्तेत असलेल्या भाजपच्या नेत्यांनाच भाजप सरकारविरोधात न्यायासाठी मोर्चे काढावे लागत असतील, तर हा कसला राजकीय विरोधाभास?

सत्तेत राहून न्याय देण्याची जबाबदारी पार पाडायची नाही आणि दुसरीकडे जनतेची दिशाभूल करण्यासाठी त्याच मोर्चात सहभागी व्हायचे, हा निव्वळ राजकीय दिखावा आहे.

सत्ताही तुमची, सरकारही तुमचे आणि न्यायासाठीचा संघर्षही तुमचाच; मग जबाबदारी घेणार कोण?

याप्रसंगी माझ्यासमवेत राम पुर्णेकर तसेच स्थानिक अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रदीप पुर्णेकर यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा असाच सुरू राहिल.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link