अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मा.सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वात तथा भाजपा जिल्हाध्यक्ष मा.डॉ.गणेश मांटे साहेब, जिल्हा सरचिटणीस मा.देविदास पाटील जाधव, जिल्हासचिव मा.ॲड.सुनिल देशमुख, तालुकाध्यक्ष मा.ॲड.मोहन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मा.सतिष पाटील भाकरे, तालुका सरचिटणीस मा.गोपाल तायडे यांच्या सहकाऱ्याने आज वरुड येथे #प्रवासी_कार्यकर्ता म्हणून योगेश राजपूत यांनी “भाजपा सदस्यता नोंदणी अभियाचा” शुभारंभ केला.
भारतीय जनता पार्टीच्या विचारावर व देशाचे महामहीम पंतप्रधान ना.नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेऊन #8800002024 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन स्थानिक गावकरी बंधु-भगिनींनी भाजपाचे सदस्यत्व स्विकारले.
यावेळी भाजपा नेते सर्वश्री मा.प्रकाश राऊत, कमलाकर उबाळे, अनिल उबाळे, पंडितराव राऊत, नारायण गोरे, विकास पोतदार, सुनिल भिवसनकर, मुकूंदा काळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच बुथ प्रमुख मा.सुरेश भिवसनकर व चक्रधर राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले.
