एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

शासनाच्या फसव्या घोषणा शेतकरी होतायं आत्महत्यांचे कारण 

आत्महत्या | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : गोपाळ भालेराव 

शेतकरी उमेदवार चक्रधर मेश्राम यांचा आरोप. ब्रम्हपुरी दि.१३/११/२०२४ महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यानी कर्जाबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येला सरकारच्या फसव्या घोषणा जबाबदार असल्याची टीका ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात शेतकरी ऊस चिन्ह घेऊन लढणारे उमेदवार चक्रधर मेश्राम यांनी केली आहे . यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील महायुती आणि महाआघाडीच्या सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. तसेच या बिघाडी सरकारला लोकांच्या प्रश्नांपेक्षा सत्ता टिकवण्याचीच अधिक चिंता असल्याचा आरोपही चक्रधर मेश्राम यांनी केला.

चक्रधर मेश्राम म्हणाले की ,“शेतकरी आत्महत्यांना सरकारच्या फसव्या घोषणा जबाबदार आहेत. अस्थिर , वादग्रस्त ठरलेल्या सरकारला लोकांची चिंता नाही. शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असून बिघाड झालेल्या सरकारला आपल्या सत्ता टिकवण्याची चिंता वाटत आहे. सरकारचं हे राजकारण जनता बघत आहे एकीकडे राज्य सरकार कर्जमाफीची घोषणा करत आहे, तर दुसरीकडे कर्जबाजाराला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरुच आहे. त्यामुळे चिंतेचं वातावरण पसरलं आहे. यातून राज्य सरकारच्या कर्जमाफीने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला की नाही? असा प्रश्न चक्रधर मेश्राम यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारकडून कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा पराकोटीने प्रामाणिक प्रयत्न करावा मात्र सरकार अपयशी ठरलं आहे. सरकारी यंत्रणेचे नेमकं कुठं चुकते याचे आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या दुर्दैवी घटना आहेत.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

पुणे येथे वाहतूक संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रिक्षा चालकांच्या विविध ज्वलंत समस्या व अडचणी संदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात लेखी निवेदन सादर करण्यात आले

Read More »

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link