एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

वीरशैव माहेश्वर मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप

वीरशैव माहेश्वर मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप

पुणे | प्रतिनिधी महालिंग स्वामी

वीरशैव माहेश्वर मंडळ, पुणे जिल्हा (स्था. १९४६) यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गौरव व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शिक्षणाला प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमास समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे समाजभूषण व प्रसिद्ध उद्योजक मा. गुरूराजजी चरंतीमठ हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फर्ग्युसन महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉ. सुशीलकुमार धनमने होते. तसेच ज्येष्ठ अभ्यासक डॉ. शामाताई घोणसे व प्रा. भीमाशंकर स्वामी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला, तसेच गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय ठेवून समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणारे सर्व सभासद, हितचिंतक, देणगीदार आणि समाजबांधव यांचे वीरशैव माहेश्वर मंडळ, पुणे जिल्हा यांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
‘वीरशैव माहेश्वर मंडळ, पुणे जिल्हा (स्था. १९४६) – समाजहितासाठी सदैव कटिबद्ध!’ हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link