मधुतारा फाउंडेशन | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | संपादकीय
दिनांक 1 नोव्हेंबर 2024 लक्ष्मीपूजनच्या पवित्रदिनी मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित.कै.ह.भ.प.भानुदास महाराज धोंडीबा तुपे.व कै.बद्रीनाथ धोंडीबा तुपे यांच्या स्मरणार्थ श्री संदीप नाना तुपे व त्यांच्या समस्त तुपे परिवाराकडून 50 सर्व प्रकारच्या दिव्यांग कुटुंबाला एक हाथ मदतीचा म्हणून मोफत दिवाळी रेशन किट भेट देण्यात आले.
या पवित्र कार्याला त्रिमूर्ती केटरर्स पुणे यांचे प्रमुख श्री सचिनजी देशमुख यांच्या वतीने दिव्यांगाना पवित्र दान म्हणजेच अन्नदान करण्यात आले तसेच मिठाई देण्यात आली.
या वेळी पुणे शहरातून आलेल्या सर्व दीव्यांगानी श्री संदीप नाना तुपे यांचे व समस्त तुपे परिवाराचे आभार मानले.तसेच सर्वाँना स्नेह भोजनाचा आनंद दिल्या बद्दल श्री सचीनजी देशमुख यांचे* *आभार मानले.तसेच मधु तारा ही दिव्यांगांच्या हक्काची पुण्यातच नाही तर महाराष्ट्र भर कार्य करते म्हणून कौतुक करत मधु ताराला आशीर्वाद दिले.
या वेळी श्री संदीप नाना तुपे यांनी आपल्या भावना व्यक्त करीत नेहमी अशीच दिव्यांगांची सेवा तुपे* *परिवाराकडून होत राहो म्हणून आपण मधु ताराच्या कार्यासोबत राहून सेवा देत राहू असे म्हंटले.
या वेळी श्री महेशजी सुरेश तुपे.श्री ऋषीकेशजी सोपान तुपे. श्री संग्रामजी रामदास तुपे.श्री रोहनजी बद्रीनाथ तुपे.सौ ऐश्वर्याताई रोहन तुपे यांनीही या पवित्र कार्यास आशीर्वाद दिले.
मधु ताराचे मार्गदर्शक श्री राम मंदिर हडपसर काळेबोराटेनगर प्रमुख आदरणीय श्री बारवकरकाका यांनीही समस्त तुपे परिवाराचे आभार मानले.
या पवित्र कार्याचे संपूर्ण आयोजन मधु तारा पुणे जिल्हा प्रमुख श्री अनिलजी दांगडे यांनी केले. दिव्यांगांचे नियोजन मधु तारा शहराध्यक्षा स्वतः दिव्यांग असलेल्या सौ मीनाक्षीताई शिंदे यांनी केले.या वेळी दोन्ही परिवाराच्या सदस्यांनी कार्यक्रमात कुठेही कमी काही पडू नये म्हणून जातींन लक्ष दिले.
या वेळी मधु तारा पुणे जिल्हा प्रमुख श्री अनिलजी दांगडे यांनी आपली नाळ तुपे परिवाराशी जोडली असल्याचे भावनिक शब्दात सांगितले.
या वेळी एक हाथ मदतीचा देऊन मधु ताराच्या हाकेला प्रतिसाद देणऱ्या मानवरुपी परमेश्र्वरच असलेल्या समस्त तुपे परिवाराचे आणि या कार्याला आपण ही समाजाचे देणे लागतो या उद्देशाने मदत करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांनी मानले.







