एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

संविधान प्रस्ताविका पाडल्याप्रकरणी काँग्रेसच्या बेमुदत आंदोलनाचा तिसरा दिवस; आंदोलन स्थळी माथेफिरूंचा वावर

संविधान प्रस्ताविका पाडल्याप्रकरणी काँग्रेसच्या बेमुदत आंदोलनाचा तिसरा दिवस; आंदोलन स्थळी माथेफिरूंचा वावर

चिंचवड/सांगवी(प्रतिनिधी) नवनाथ वाकडकर

दिनांक २४ ऑक्टोबर २०२६:- सांगवी येथील संविधान चौकातील भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या शिल्पाची कथित मोडतोड करून ते हटविण्यात आल्याच्या निषेधार्थ सुरू असलेल्या बेमुदत धरणा आंदोलनाचा शनिवारी(दि.२४) तिसरा दिवस असून संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्प पूर्ववत स्थापित करावे, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी आणि संबंधित लोकप्रतिनिधीं तसेच आंदोलन स्थळी माथेफिरूंचा वावर वाढला असून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत, अशा प्रमुख मागण्या काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी केल्या आहेत. या आंदोलनाला विविध कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत असून, आगामी काळात अधिक संघटना सहभागी होतील.

यावेळी नरेंद्र बनसोडे म्हणाले की, संविधान चौकातील भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या शिल्पाची मोडतोड करून ते हटविण्यात आले आहे. नवीन शिल्प उभारण्याचे कारण सांगितले जात असले, तरी या कामासाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता, नवीन शिल्पाची मंजुरी, कार्यारंभ आदेश किंवा जुने बांधकाम हटविण्याचे आदेश महानगरपालिकेकडून देण्यात आले नाहीत.या प्रकरणात महानगरपालिकेच्या संबंधित प्रभाग कार्यालयाने पोलीस आयुक्तांना पत्र देऊन काम विनापरवाना व बेकायदेशीर असल्याचे कळविले आहे. आंदोलन स्थळी माथेफिरू तथा समाजकंटक पाठवून आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचे काम विरोधक करत आहेत.

संबंधितांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळत असली, तरी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवसापर्यंत एफआयआरची प्रत मिळाली नसून त्यामुळे नेमकी कोणती कलमे लावण्यात आली आहेत, याची अधिकृत माहिती मिळालेली नाही.या प्रकरणात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, राष्ट्रीय सन्मानाच्या प्रतीकांचा अवमान आणि समाजात तेढ निर्माण करण्यासंदर्भातील तरतुदींनुसार कारवाई करावी. तसेच संबंधित नगरसेविका तृप्ती कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्प पूर्ववत स्थापित करावे.मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार बनसोडे यांनी व्यक्त केला.

युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अनिकेत सोनवणे म्हणाले की,संविधानामुळेच लोकशाही व्यवस्थेत सर्वसामान्य नागरिकांना आणि महिलांना उच्च पदांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे संविधान हे केवळ कागदावरील लिखाण नसून, प्रत्येक नागरिकाचा स्वाभिमान आणि सन्मान आहे.संबंधित नगरसेविका तृप्ती संतोष कांबळे यांनी या घटनेबाबत सार्वजनिकरीत्या खुलासा करावा, माफी मागावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा. संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्प हटविण्यापूर्वी नियमानुसार प्रक्रिया पार पाडली गेली होती का, याची चौकशी व्हावी.या प्रकरणात संबंधितांवर योग्य त्या कायदेशीर तरतुदींनुसार फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि शिल्पाची पुनर्स्थापना करावी.या आंदोलनाला युवक काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे सोनवणे यांनी स्पष्ट केले.

आंदोलन स्थळी काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे विभागीय उपक्रम निरीक्षक तौफिक हंडी,शहरातील पुरोगामी चळवळीचे नेते मानव कांबळे, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयिका समिता गोरे, काँग्रेस नेते राहुल वंजारी, अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष रवी नांगरे, अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष शाबुद्दीन शेख,प्रदेश युवा काँग्रेसचे सचिव अनिकेत सोनवणे, स्वराज इंडिया अभियानचे प्रदीप पवार, आम आदमी पार्टीचे जितू बावनकर, संविधान जागर अभियानाचे श्रीकृष्ण कुलकर्णी शुभम हल्ले, स्नेहल शुभांगी, ऋषी कापडी, ज्येष्ठ गायक अशोक गायकवाड, शहर काँग्रेसचे पदाधिकारी, बीबी शिंदे, हरीश डोळस, डेनिस देवन सन, रिजवान खान, अमरपालसिंग पोथिवाल, रामकिसन माने, सुरज माने, बाबा गायसमुद्रे, शुभम थोरात, सदाशिव तळेकर, हिराचंद जाधव, आदिनाथ जावीर आदी उपस्थित होते.

 

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link