एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

तुरीच्या शेतात गांजाची लागवड; अडावद पोलिसांची धडक कारवाई

तुरीच्या शेतात गांजाची लागवड; अडावद पोलिसांची धडक कारवाई

१७५ गांजाची झाडे जप्त; देवसिंह बरेला पोलिसांच्या ताब्यात — मध्यप्रदेश सीमेलगत कारवाई

उप संपादक | प्रणित काठोके

अडावद पोलिस स्टेशन हद्दीतील देवझिरी गावातील शेतशिवारात तुरीच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डीवायएसपी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अडावदचे प्रभारी एपीआय प्रशांत कंधारे यांच्या पथकाने मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी कारवाई करत गांजाची तब्बल १७५ झाडे जप्त केली आहेत. या कारवाईत देवसिंह बरेला याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवझिरी गावातील शेतशिवारात तुरीच्या पिकामध्ये गांजाची झाडे लावण्यात आली होती. तुरीच्या पिकामध्ये ही झाडे लपवून त्यांची लागवड करण्यात आल्याने सहजासहजी हा प्रकार निदर्शनास येत नव्हता. मात्र पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासणी केली असता गांजाची लागवड केल्याचे उघड झाले.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून १७५ गांजाची झाडे जप्त केली असून, या झाडांचे वजन व बाजारमूल्य याबाबतची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. संशयित आरोपी देवसिंह बरेला याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गांजाची लागवड नेमकी कोणाच्या सांगण्यावरून किंवा अन्य कोणी या प्रकारात सहभागी आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

विशेष म्हणजे, देवझिरी परिसर हा मध्यप्रदेशच्या सीमेलगत असल्याने या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सीमाभागातून अमली पदार्थांची तस्करी किंवा अवैध लागवडीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून परिसरात विशेष लक्ष ठेवले जात आहे.

या कारवाईमुळे अवैध गांजा लागवड करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अडावद पोलिसांच्या या कारवाईचे परिसरात कौतुक होत आहे. प्रकरणाचा पुढील तपास अडावद पोलिसांकडून सुरू आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link