एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

मुक्ताईनगरात इंडियन गॅस गोदामावर चोरट्यांचा डल्ला; ८४ हजारांचे सिलेंडर लंपास

मुक्ताईनगरात इंडियन गॅस गोदामावर चोरट्यांचा डल्ला; ८४ हजारांचे सिलेंडर लंपास

उप संपादक | प्रणित काठोके

मुक्ताईनगर–मलकापूर मार्गावरील NH-753L रस्त्यालगत असलेल्या इंडियन गॅस गोदामातून अज्ञात चोरट्यांनी घरगुती तसेच व्यावसायिक वापराचे तब्बल ८४ हजार २०१ रुपये किमतीचे गॅस सिलेंडर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी १७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून १८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या कालावधीत मुक्ताईनगर येथील इंडियन गॅस गोदामात घडली. या प्रकरणी इंडियन गॅसचे मॅनेजर दिपक समाधान कवळे (वय ४३, रा. धरणगाव, ता. मलकापूर, जि. बुलढाणा) यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये १४.२ किलो वजनाचे घरगुती वापराचे २४ रिकामे सिलेंडर, किंमत ५२ हजार ८०० रुपये; १० किलो वजनाचे ३ रिकामे सिलेंडर, किंमत ९ हजार रुपये; १० किलो वजनाचे ३ भरलेले घरगुती गॅस सिलेंडर, किंमत ११ हजार ३१ रुपये; तसेच ५ किलो वजनाचे ६ भरलेले व्यावसायिक वापराचे सिलेंडर, किंमत ११ हजार ३७० रुपये, अशा एकूण ८४ हजार २०१ रुपये किमतीच्या सिलेंडरांचा समावेश आहे.

अज्ञात चोरट्याने गोदामातील भरलेले तसेच रिकामे गॅस सिलेंडर चोरी करून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटना लक्षात आल्यानंतर गोदाम व्यवस्थापनाकडून पोलिसांना माहिती देण्यात आली.

या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाणे भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१(४), ३०५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुक्ताईनगर पोलीस करीत आहे

गॅस सिलेंडरसारखा ज्वलनशील व संवेदनशील मुद्देमाल मोठ्या प्रमाणावर चोरीला गेल्याने या घटनेची पोलिसांकडून गांभीर्याने चौकशी सुरू असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link