शिरूर पोलिसांची धमाकेदार कामगिरी
शिरुर परिसरात एन.डी.पी.एस. कायदयांतर्गत कारवाई करून ११० ग्रॅम वजनाचा २२,००,०००/- रु. किं.चा एम.डी. अंमली पदार्थ हस्तगत करून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले स्थानिक गुन्हे शाखा व शिरुर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण ची कारवाई
प्रतिनिधी अशोक पाचुंदकर पुणे
नशामुक्त भारत अभियाना व ड्रग्स फ्रि महाराष्ट्र या उपक्रमाची सुरूवात करणेत आलेली असून प्राधान्याने कारवाया करून नशामुक्त देश करण्याचे अनुषंगाने पुणे ग्रामीण हद्दीत अंमली पदार्थ तसेच तंबाखूजन्य पदार्थाची बेकायदेशीर रित्या विक्री अगर सेवन होवू नये या करीता श्री. संदीप सिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी अवैध व्यवसायांवरील कारवाईचा बडगा चालू ठेवत अवैध रित्या अंमली पदार्थ व तंबाखूजन्य पदार्थ विनापरवाना जवळ बाळगणारे विक्री करणारे व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद क्षीरसागर, स्थानिक गुन्हे शाखा यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार अंमली पदार्थ व तंबाखूजन्य पदार्थ जवळ बाळगणारे विक्री करणा-यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली.
दिनांक १८/०८/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मा. पोलीस अधीक्षक साो. पुणे ग्रामीण यांचे आदेशान्वये अवैध व्यवसायांवर कारवाई करणेच्या अनुषंगाने शिरुर परिसरात गस्त करत असताना शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थाची बेकायदेशीर रित्या देवाण-घेवाण होणार असून खात्रीशीर माहिती काढून कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल साो. पुणे ग्रामीण, यांनी पथकाला दिले होते. स्था.गु.शा.चे पथकाने पोनि प्रमोद क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली माहिती काढत असताना पो.हवा. तुषार पंधारे, नेम. स्था.गु.शा. यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, इसम नामे १) सुरेंदसिंह भैरुसिंह राठोड उर्फ राजपुत वय २४ वर्षे सध्या रा. मनिश शिरोळे फॉर्म हाऊस मलठण ता. शिरूर जि.पुणे मुळ रा. गोगादेव की ढाणी बॉकियावास खुर्द ता. कल्याणपुर जि. बाड़मेर राज्य राजस्थान ३४४०२६, २) श्रवण तेजाराम बिष्नोई वय ३१ वर्षे रा. मनिश शिरोळे फोर्म हाऊस मलठण ता. शिरूर जि. पुणे मुळ रा. बॉकियावास खुर्द ता. कल्याणपुर जि. बाडमेर राज्य राजस्थान हे त्यांचे ताब्यात प्रतिबंधीत एम. डी. अंमली पदार्थ बाळगून त्याची विक्री करणेसाठी मौजे मलठण गावचे हृददीत राजावाडा चैक, ता. शिरूर जि. पुणे येथे अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाली, त्या माहितीचे अनुषंगाने पथकाने कायदेशीर तरतुदींची पुर्तता करत उपविभागीय पोलीस अधिकारी शिरुर उप विभाग शिरूर यांचे आदेश प्राप्त केले. छापा कारवाईचे सर्व साहीत्य व पंचांसह स्था.गु.शा. व शिरुर पो स्टे चे पथक संयुक्त कारवाई साठी रवाना झाले. मिळालेल्या बातमीचे ठिकाणी दि. १८/०८/२०२६ रोजी ००.१० वा. सुतास पथकाने जावून छापा कारवाई केली. कारवाई दरम्यान आरोपी १) सुरेंदसिंह भैरुसिंह राठोड उर्फ राजपुत वय २४ वर्श सध्या रा. मनिश शिरोळे फॉर्म हाऊस मलठण ता. शिरूर जि. पुणे मुळ रा. गोगादेव की ढाणी बांकियावास खुर्द ता. कल्याणपुर जि. बाड़मेर राज्य राजस्थान ३४४०२६, २) श्रवण तेजाराम विष्नोई वय ३१ वर्श रा. मनिश शिरोळे फोर्म हाऊस मलठण ता. शिरूर जि. पुणे मुळ रा. बांकियावास खुर्द ता. कल्याणपुर जि. बाडमेर राज्य राजस्थान यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचे ताव्यात ११० ग्रॅम वजनाचा प्रतिबंधीत एम.डी. अंमली पदार्थ, मोटार सायकल असा २२,००,०००/- रू.चा मुद्देमाल मिळून आला आहे. त्याबाबत शिरुर पोलीस स्टेशन गु.र.नं. ७४४/२०२६ एनडीपीएस कायदा कलम ८ (क), २२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, पुणे विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रविंद्र भासले, शिरूर उपविभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिरुर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सपोनि नितीन केनेकर, पोसई गोविंद खटिंग, स्था. गुशा. चे पोलीस अंमलदार संजय पड्याळ, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजु मोमीन विकास पाटील, सागर धुमाळ, चेतन पाटील, शिरूर पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार संदीप खेडकर, रवी काळे, ठोसरे यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशन हे करत आहेत.
पुणे ग्रामीण पोलीस









