एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

मुक्ताईनगरात इंडियन मेडिकल असोसिएश चा इशारा; CCMP पात्र BHMS डॉक्टरांच्या MMC नोंदणीला तीव्र विरोध

मुक्ताईनगरात इंडियन मेडिकल असोसिएश चा इशारा; CCMP पात्र BHMS डॉक्टरांच्या MMC नोंदणीला तीव्र विरोध

उप संपादक | प्रणित काठोके

इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्र राज्य मुक्ताईनगर शाखेच्या वतीने CCMP पात्रता प्राप्त BHMS डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) मध्ये नोंदणी करण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकरण, जळगाव, तहसीलदार मुक्ताईनगर यांना निवेदन सादर करून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, CCMP पात्रता असलेल्या BHMS डॉक्टरांना MBBS शिक्षण व प्रशिक्षणाशिवाय आधुनिक वैद्यक (Modern Medicine) करण्याची परवानगी देणे रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर बाब ठरू शकते. आधुनिक वैद्यकासाठी आवश्यक असलेले वैज्ञानिक व क्लिनिकल प्रशिक्षण हे MBBS अभ्यासक्रमातूनच मिळते. त्यामुळे केवळ CCMP पात्रतेच्या आधारे MMC मध्ये नोंदणी करणे योग्य नसल्याचे IMA चे म्हणणे आहे.
IMA ने आपल्या निवेदनात पुराव्यावर आधारित (Evidence-based) वैद्यकीय सेवांचा दर्जा अबाधित राखण्यावर भर दिला आहे. तसेच BHMS डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेकडे आधीच असल्याने MMC मध्ये स्वतंत्र नोंदणीची आवश्यकता नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, संबंधित प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचा उल्लेख करत अंतिम निर्णय होईपर्यंत CCMP पात्रता असलेल्या BHMS डॉक्टरांची MMC मधील नोंदणी स्थगित ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
IMA मुक्ताईनगर शाखेने शासनाने या विषयात तातडीने लक्ष घालून रुग्णहित आणि वैद्यकीय व्यवसायाचे उच्च मानदंड कायम राखण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
IMA मुक्ताईनगर शाखेच्या प्रमुख मागण्या :
CCMP पात्रता असलेल्या BHMS डॉक्टरांची MMC मधील नोंदणी थांबवावी.
सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत कोणतीही अंमलबजावणी करू नये.
रुग्णांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन आधुनिक वैद्यकीय शिक्षणाचे निकष कायम ठेवावेत.
शासनाने या विषयावर तातडीने हस्तक्षेप करून योग्य निर्णय घ्यावा.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link