एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

त्र्यंबक स्वामी यांच्या पाठपुराव्याला यश; विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवीन एमआरआय मशीन सुरू

त्र्यंबक स्वामी यांच्या पाठपुराव्याला यश; विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवीन एमआरआय मशीन सुरू

प्रतिनिधी | लातूर महालिंग स्वामी

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी अत्याधुनिक व कोट्यवधी रुपये किमतीची नवीन एमआरआय (MRI) मशीन दिनांक २२ जुलै २०२६ पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण सुविधेमुळे लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील हजारो रुग्णांना वेळेत आणि दर्जेदार निदान सेवा उपलब्ध होणार असून रुग्णांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.

ही सुविधा सुरू करण्यासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अभ्यागत मंडळ सदस्य, शिव आरोग्य सेना लातूर जिल्हा समन्वयक तसेच राष्ट्रीय जंगम संघटनेचे लातूर जिल्हा कार्याध्यक्ष त्र्यंबक गुरूनाथ स्वामी यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहीते आणि रेडिओलॉजी विभागप्रमुख डॉ. बालाजी कोंबडे यांनी प्रभावी प्रशासकीय पाठबळ दिल्यामुळे हा महत्त्वाचा उपक्रम प्रत्यक्षात साकार झाला.

नवीन एमआरआय मशीनमुळे मेंदू, मणका, सांधे, हृदय तसेच इतर गंभीर आजारांचे अचूक निदान अधिक जलद आणि अत्याधुनिक पद्धतीने करता येणार आहे. यामुळे खासगी रुग्णालयांवरील आर्थिक भार कमी होऊन सर्वसामान्य नागरिकांना शासकीय रुग्णालयातच दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

याप्रसंगी त्र्यंबक गुरूनाथ स्वामी यांनी अधिष्ठाता डॉ. उदय मोहीते आणि रेडिओलॉजी विभागप्रमुख डॉ. बालाजी कोंबडे यांचे रुग्णहितासाठी केलेल्या सकारात्मक निर्णयाबद्दल मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी भविष्यातही रुग्णांना अधिकाधिक आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने अशाच प्रकार�

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link