एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘नमस्ते दिन’ निमित्त कळमनुरीत सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप

स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘नमस्ते दिन’ निमित्त कळमनुरीत सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप

कळमनुरी | प्रतिनिधी : सतीश लोंढे

स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘नमस्ते दिन’ निमित्त कळमनुरी नगरपालिकेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांसाठी रेनकोट वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. पावसाळ्यात कर्तव्य बजावताना सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सोयीस्कर वातावरण मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमात नगराध्यक्ष आश्लेषा वैभव चौधरी (उर्फ आर. आर. पाटील) आणि उपनगराध्यक्ष शिवराज पाटील यांच्या हस्ते सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक करत त्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी नगरपालिका कायम कटिबद्ध असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास अनिल भोरे, नगरसेवक प्रतिनिधी बाळू पाटील, विलास उत्तमराव शिंदे, कुलभूषण बुर्से, नगरसेवक बाबा भाई तसेच नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, नगरपालिकेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link