विद्यार्थ्यांचे योगदान अनमोल – जितेंद्र भामरे
प्रतिनिधी रवींद्र पाटील
CSEET परिक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी ICSI नाशिकच्या चॅप्टरच्या सभागृहात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक चॅप्टरचे अध्यक्ष CS जितेंद्र भामरे, सचिव CS गौरव पाटील व खजिनदार CS सागर कुलकर्णी हे होते. मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्याचे त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनदंन केले व उज्वल यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्राची सपकाळे हिने परिक्षेसाठी च्या तयारीचा सर्व अनुभव आपल्या मनोगतात व्यक्त केले. यावेळी दिशोत्तमा पाटील, भुमिका पाटील, आदिती लोखंडे, सोनाक्षी चांडक, स्नेहा होनराव,युक्तिका बोरस्ते, पुर्वा यादव व प्राची सपकाळे या यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. शंकर सर यांनी केले. यावेळी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.








