एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

हरवलेली ४ वर्षीय चिमुकली बार्शी शहर पोलिसांनी सुखरूप शोधून पालकांच्या ताब्यात दिली

हरवलेली ४ वर्षीय चिमुकली बार्शी शहर पोलिसांनी सुखरूप शोधून पालकांच्या ताब्यात दिली

प्रतिनिधी रणजीत मस्के

बार्शी शहरातील मांगडे चाळ परिसरातील रुद्राक्षा बाबासाहेब मांगडे (वय ४ वर्षे) ही चिमुकली आज सकाळी सुमारे ७.०० वाजण्याच्या दरम्यान घरातील कोणालाही न सांगता घरातून निघून गेली होती. मुलगी दिसून न आल्याने तिचे वडील बाबासाहेब दगड्डु मांगडे यांनी बार्शी शहर पोलीस ठाणे येथे येऊन माहिती दिली व मुलीचा शोध घेण्याची विनंती केली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बार्शी शहर पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली. पोलिसांनी परिसरात शोध घेत असताना सदर मुलगी टिळक चौक, बार्शी येथे सुखरूप मिळून आली. त्यानंतर तिला पोलीस ठाण्यात आणून तिच्या आई-वडिलांच्या समक्ष विचारपूस करण्यात आली. यावेळी तिने खेळणे घेण्यासाठी घरातून आल्याचे सांगितले.

त्यानंतर मुलगी सुरक्षित असल्याची खात्री करून तिला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले. मुलगी सुखरूप मिळाल्याने तिच्या पालकांनी बार्शी शहर पोलिसांचे आभार मानले.

सदर कामगिरी मा. पोलीस निरीक्षक श्री. बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना/७५९ संगप्पा मुळे, पो.कॉ./७४७ राहुल बोंदर व पो.कॉ./९४८ संतोष जाधवर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

बार्शी शहर पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेली चिमुकली अल्पावधीतच शोधून काढण्यात यश आले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link