घर फोडीचा गुन्हा ४८ तासात उघड करुन एकुण रक्कम ३,१०,५००/- मुद्देमाल जप्त
जप्त करण्यात पालघर पोलीसांना यश
प्रतिनिधी रणजीत मस्के
दिनांक ०५.०६.२०२६ रोजी सकाळी ०८.३० ते २२.३० वा. च्या सुमारास करजगांव, पाटीलपाडा ता. तलासरी येथील राहणारे फिर्यादी नामे अजय नरेश घुटे हे त्याचे राहत घर बंद करुन त्यांचे दुकानात गेले होते. ते दुकानातुन परत आल्यावर यांच्या लक्षात आले की, कोणी तरी अज्ञात इसमाने त्यांचे घरचे पाठीमागील दरवाजा तोडून आत प्रवेश करुन घरातील लोखंडी कपाट तोडुन कपाटातील ३ लाख रुपये रोख रक्कम घरफोडी चोरी केली आहे. त्याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तलासरी पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र. १६८/२०२६ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०५ (अ), ३३१ (अ), ३३१ (४) प्रमाणे दिनांक ०६.०६.२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे गांर्भीय लक्षात घेवुन श्री यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी तपासाबाबत सुचना देवुन तलासरी पोलीस ठाणेचे पोलीस पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकाने सीसीटीव्ही आधारे गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे विधिसंघर्षीत बालक वय – १६ वर्षे यांचेकडे विचारपुस केली असता त्यांने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांच्या ताब्यात चोरीस गेलीली ३ लाख रुपये रोख रक्कम १० हजार किमीचा मोबाईल व ५०० रुपये किंमतीची बॅग असा एकुण ३,१०,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे. सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास श्रेणी पोलीस उप निरीक्षक विष्णु राजड नेमणुक तलासरी पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक पालघर, श्रीमती अंकिता कणसे, उप विभागीय पोलीस अधिकारी डहाणू विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अजय गोरड, प्रभारी अधिकारी तलासरी, श्रेणी पोउपनि विष्णु राजड, पोहवा संदिप नांगरे, पोहवा अनिल सोनवणे, पोशि योगेश मुढे सर्व नेमणुक तलासरी पोलीस ठाणे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडलेली आहे.








