रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात
८०० फूट दरीत कोसळली स्कॉर्पिओ
साताऱ्यातील ८ तरुणांचा जागीच अंत
प्रतिनिधी मुकुंद मोरे
महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ ८०० फूट दरीत कोसळली, ८ जणांचा समावेश, २ मृतदेह बाहेर काढले
पोलादपूर महाबळेश्वर राज्य मार्गावरील प्रतापगड दर्शन पॉईंटपासून सुमारे २०० मीटर अंतरावर असलेल्या आंबेनळी घाटात रविवारी रात्री भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक स्कॉर्पिओ गाडी तब्बल ८०० फूट खोल दरीत कोसळली. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात सुमारे ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून, आतापर्यंत २ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अपघातग्रस्त सर्वजण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच रविवारी रात्री १० वाजल्यापासून महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमकडून युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले. पोलीस आणि प्रशासनाची टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे. मात्र, दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप समजले नाही.








