एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

शिक्षण विभाग एरंडोल यांचा समावेशित शिक्षण प्रशिक्षण संपन्न

शिक्षण विभाग एरंडोल यांचा समावेशित शिक्षण प्रशिक्षण संपन्न

प्रतिनिधी स्वप्नील पाटील

​एरंडोल – शिक्षण विभाग, पंचायत समिती व गटसाधन केंद्र यांच्या वतीने येथील के. डी. पाटील इंग्लिश स्कूलमध्ये १७ व १८ मार्च २०२६ रोजी दोन दिवसीय ‘ समावेशित शिक्षण ‘ प्रशिक्षण दिव्यांग विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहातील शिक्षणात समाविष्ट करून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी
‘समावेशित शिक्षण’ (Inclusive Education) विषयावर विशेष प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. हा कार्यक्रम स्थानिक शिक्षण विभाग, समग्र शिक्षा अभियान आणि गट साधन केंद्र एरंडोल विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
या शिबिरात तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सक्रिय सहभाग घेतला.
याप्रसंगी ​मार्गदर्शक वैशाली पाटील, डाॅ.मनिषा पवार, वर्षा पाटील आणि संदीप महाजन यांनी सुलभक म्हणून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या समस्या व शासकीय योजनांवर सविस्तर प्रकाश टाकला.
​​समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना गटशिक्षणाधिकारी आर. डी. महाजन यांनी स्पष्ट केले की,” संवेदनशीलता ही काळाची गरज असून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे केवळ कर्तव्य म्हणून न पाहता संवेदनशीलतेने पाहणे आवश्यक आहे. शिबिराचा ​प्रमुख उद्देश दिव्यांग हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि समाजात याविषयी जागरूकता निर्माण करणे असून ती काळाची गरज आहे हे स्पष्ट करण्यात आले. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी जे डी पाटील यांनी याविषयांमध्ये समावेशित शिक्षणाची संकल्पना, RPwD कायदा २०१६ ची अंमलबजावणी, वैयक्तिक शिक्षण योजना (IEP) तयार करणे, सहाय्यक साधने (assistive devices) वापरणे, TLM (Teaching Learning Material) निर्मिती आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन पद्धती यांचा समावेश याची माहिती दिली या प्रशिक्षणामुळे प्रत्यक्ष कामातील अडचणी दूर होण्यास मदत होईल.”
​यावेळी तालुका विशेष शिक्षक चंद्रकांत पाटील, युवराज पाटील, विजय बडगुजर,दत्तू पवार, सुनिता डाके भालेराव यांच्यासह विविध केंद्रांचे केंद्रप्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मंदार वडगावकर यांनी केले तर आभार युवराज पाटील यांनी मानले. या उपक्रमामुळे तालुक्यातील दिव्यांग शिक्षण चळवळीला नवचैतन्य मिळाले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link