एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

भगवा तलाव उर्फ काळा तलाव च्या आत मध्ये कॅन्टीन सुरू करण्याबाबत महानगरपालिकेला दुर्बुद्धी कशी काय सुचली? त्याबाबत तक्रार!

भगवा तलाव उर्फ काळा तलाव च्या आत मध्ये कॅन्टीन सुरू करण्याबाबत महानगरपालिकेला दुर्बुद्धी कशी काय सुचली? त्याबाबत तक्रार!

प्रतिनिधी मुकुंद मोरे

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण
मा. आरोग्य अधिकारी
क.डो.म.पा, कल्याण [प]

विषय :- भगवा तलाव उर्फ काळा तलाव च्या आत मधे Canteen सुरु करण्यासाठी महानगरपालिकेला दुर्बुद्धी कशी काय सुचली त्याबाबत तक्रार .
महोदय,
वरील विषयानुसार आपणास कळविण्यात येथे की, आमच्या कल्याण शहरातला भगवा तलाव उर्फ काळा तलाव याचे करोडो रुपये खर्च करून सुशोभिकरण करण्यात आले तसेच त्या तलावामधून प्रचंड मोठया प्रमाणात घाण काढुन ते पाणी स्वच्छ करण्यात आले याची कल्पना बहुतेक आयुक्त साहेब आपणास असेलच. कल्याण शहरातुन आज अनेक लोक, गरोदर महिला, लहान मुल, ज्येष्ठ नागरिक त्या तलावावर व्यायाम व फिरायला येतात, तसेच लहान मुल तेथे खेळण्यासाठी मोठया प्रमाणात येतात . आमच्या कल्याण शहरात आता ही एकच अशी जागा आहे जिथे लोकांना घाणीच्या आणि धुळीच्या साम्राज्यातून थोडा मोकळा स्वास मिळतो. त्या तलावा मधे अनेक व्यायामाचे साहित्य तुटले आहेत अनेक लहान मुलांचे खेळण्याच्या साहित्य सुध्दा तुटलेले आहे पण ते दुरुस्त करण्यासाठी महानगरपालिका कधीच तत्परता दाखवताना दिसत नाही. तलावाच्या आत मधे दोन तरी पोलीस असणे गरजेचे आहे कारण तिकडे अनेक वेळा बऱ्याच ठिकाणी दादागिरी चालु असते पण त्याकडे मात्र आयुक्त साहेब आपले पुर्णपणे दुर्लक्ष्य आहे .
महोदय परंतु एकादे स्वच्छ ठिकाण कसे घाण होईल किवा महानगरपालिकेला कस उत्पन्न सुरु होईल या कडे ज्याप्रमाणे लक्ष आपण देत आहात व त्याचे negative परिणाम काय जनतेला भोगावे लागतील याचा कुठला ही विचार न करता आपण सरासपणे त्या तलावाच्या आत मधे CANTEEN सुरु करण्याचा जो घाट घातला आहे तो पुर्णपणे चुकीचा आहे.
CANTEEN सुरु झाली म्हणजे तेथे लोक खातील , घाण करतील, तलावात घाण फेकली जाईल, तेथे उंदीर , घुशी , कुत्र्यांचे प्रमाण वाढेल आणि हळुहळू तो भगवा तलाव घाणीचे साम्राज्य होऊन बसेल, कारण घाण होणे हे CONTROL महानगरपालिका करूच शकत नाही.शहरात एवढी घाण आहे बऱ्याच ठिकाणी ती साफ होत नाही आणि आता नवीन घाणीच साम्राज्य निर्माण करण्यसाठी महानगरपालिकेचा अट्टहास चालला आहे . आयुक्त साहेब आम्ही कल्याणकर एवढा कर भरतो तो कमी पडतो का महानगरपालिकेला ? की लोकांसाठी बांधलेल्या GARDEN मधे पण तुम्हाला पैसे कमवण्याचे डोहाळे लागले आहेत एकतरी जागा मोकळा श्वास घेण्यासाठी कल्याणकरांना सोडणार आहात की नाही ? CANTEEN चालु करायच्या असतील तर ते भगवा तलावाच्या बाहेर चालु करावे आतमधे नाही याचा आम्ही विरोध करतो आम्हाला आमच्या GARDEN ची दुरवस्था करायची नाही आहे त्यामुळे ते काम तात्काळ बंद करावे. आयुक्त साहेब आपण एवढे उच्च शिक्षित व्यक्ती असुन ही असे चुकीचे निर्णय घेऊन आमच्या कल्याण च्या नागरिकांच्या आरोग्याशी कसे काय खेळु शकता , एकतर कल्याणची अवस्था तर बिकट आहेच, ना रस्ते धड, रस्त्यांवर प्रचंड धुळ, फेरीवाल्यांची दादागिरी लोकांना चालण्यासाठी फुटपाथ नाही, SKYWALK वर फेरीवाले आणि वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांचे सुळसुळाट , TRAFFIC मधे रोज लोक एक दोन तास अडकून राहतात अश्या अनेक समस्यांनी कल्याणकर वैतागला आहे , महानगरपालिका टक्केवारी खाऊन मस्त आणि जनता मात्र त्रस्त अशी अवस्था करून ठेवलेलीच आहे आणि आता एक GARDEN जे लोकांना फिरण्यासाठी बनवलेले आहे करोडो रुपये खर्च करून तिकडे पण हे अश्या CANTEEN चालु करून वाट लावण्याच नियोजन आयुक्त साहेब आपण का करत आहात थोडा ही विचार न करता. चांगल्या गोष्टींचे पण वाटोळे करण्यासाठी आपली नियुक्ती झालेली आहे का ? असे आम्हा कल्याणकरांना वाटायला लागले आहे. BOATING चालु केली त्याला आमच समर्थन आहे एक चांगला उपक्रम चालु केला आहे त्याचे आम्ही स्वागत करतो. पण CANTEEN चा विरोध हा आमचा नेहमीच असेल याची आपण नोंद घ्यावी
आमची अशी मागणी आहे की पत्र मिळताच आठ दिवसाच्या आत ते सगळी CANTEEN तात्काळ बंद करावे आणि त्याची जी काय प्रोसेस चालु केलेली आहे ती कायमस्वरूपी रद्द करावी आणि तुम्हाला एवढेच CANTEEN चालु करण्याचे डोहाळे लागले असतील तर ते तलावाच्या बाहेर करावे त्याबाबत आमचा विरोध नाही . पण जर आपण येत्या आठ दिवसात हे CANTEEN बंद नाही केले आणि आम्हा कल्याणकरांन वर जबरदस्ती लादण्याचा प्रयत्न केला स्वताच्या आणि ठेकेदाराच्या फायदयासाठी तर आम्हाला आपल्या विरोधात तीव्र आंदोलन घ्यावे लागेल याची आपण गांभिर्याने नोंद घ्यावी आणि त्यावेळेस कायदा सुव्यस्थेचा प्रशन निर्माण झाला तर त्याला जबाबदार आपण व महानगरपालिका असेल याची आपण नोंद घ्यावी .
आपण आमच्या शहराचे पालक म्हणुन आला आहात तर कृपया शहराची वाट लावू नका , उलट जेवढ चांगल काम कराल तेवढीच कल्याण ची जनता तुमच्यावर प्रेम करेन तुम्हाला पाठिंबा देईल , जसे E RAVINDRAN साहेबांसाठी , तुकाराम मुंडे साहेबांसाठी स्वता जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली , तीच अपेक्षा आम्हाला तुमच्याकडुन आहे . शिव्या शाप खाण्यापेक्षा लोकांचे आयुक्त साहेब आशीर्वाद घ्यावे तेच कामात येईल आयुष्यात.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link