अन्यायाला गाडण्यासाठी या भ्रष्ट सरकारविरुद्ध
प्रतिनिधी तेजस विचारे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोमवार दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी, दुपारी ४ वाजता गडकरी रंगायतन ते ठाणे महानगरपालिका असा ‘धडक मोर्चा’ काढणार असून त्यानिमित्ताने आज संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली.
या पत्रकार परिषदेत माझ्यासह मनसे नेते व पालघर, ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. अविनाश जाधव, मनसे नेते श्री. अभिजित पानसे, मनसे नेते व माजी आमदार श्री. राजू पाटील, मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष श्री. रवींद्र मोरे तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिवसेना नेते आणि माजी खासदार माननीय श्री राजन विचारे साहेब ठाणे जिल्हाप्रमुख श्री. केदार दिघे, शिवसेनेचे प्रवक्ते श्री. अनिश गाढवे व ठाणे जिल्हा संघटिका माजी नगरसेविका रेखा खोपकर यांची उपस्थिती होती.










