शाळा व संस्थेची चौकशी थांबवण्यास स्वयंघोषित अध्यक्ष शिवाजी जाधव हायकोर्टात पळाले
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सखाराम कुलकर्णी
नांदेड- जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी संस्थेची वैद्य कार्यकारणी नसल्यामुळे व तिन्ही शाळेतील त्यांच्या गैर व नियम शिक्षक नियुक्तींच्या चौकशी करून प्रशासन नेमण्याच्या शिक्षण उपसंचालक लातूर यांच्या आदेशानुसार शिक्षणाधिकारी माध्यमिक नांदेड यांनी समिती स्थापन केली या आदेशाविरुद्ध व चौकशी थांबवण्यास संस्थेचे स्वयंघोषित अध्यक्ष शिवाजी जाधव उच्च न्यायालयात पळाले.
जनता शिक्षण मंडळ उमरदरी ता. मुखेड संस्थेच्या नरसिंह विद्यामंदिर उमरदरी, शिवाजी विद्यालय सिडको व नरसिंह विद्यामंदिर नांदेड या शाळा आहेत या शाळेत गैरशिक्षक नियुक्ती, गैर पदोन्नतीस व संस्थेवर जुलै २०१५ म्हणजे दहा वर्षापासून वैद्य कार्यकारणी नाही. म्हणून संस्थेचे गैर अर्जदार सखाराम कुलकर्णी यांनी शिक्षक संचालक पुणे व शिक्षण उपसंचालक लातूर यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती. त्यांच्या तक्रारीवर व चौकशीच्या मागणीनुसार शिक्षण उपसंचालक लातूर यांनी शाळांतील गैर कारभार व नियमबाह्य़ शिक्षक भरतीची तसेच प्रशासक नियुक्ती बाबत चौकशी करण्याचे आदेश दि.०६-०६-२०२५ शिक्षणाधिकारी नांदेड यांना देऊन अवहाल मागितला. या आदेशावर शिक्षणाधिकारी माध्यमिक नांदेड यांनी दि.०४-०८-२०२५ ला चार सदस्यीय समिती स्थापन केली. समिती स्थापन झाल्यामुळे चौकशीतून आपले सर्व गैरकाम व भ्रष्टाचार उघड होऊन शाळेवर प्रशासक नियुक्त होईल. ह्या भीतीमुळे संस्थेचे माजी व स्वयंघोषित अध्यक्ष शिवाजी नागोराव जाधव ही चौकशी थांबण्यास उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजी नगर न्यायालयात धाव घेतली व शिक्षण विभाग, तसेच तक्रारदार सखाराम कुलकर्णी यांचे विरुद्ध रिट याचिका दाखल केली. . उच्च न्यायालय रिट याचिका क्र.१०६१५/२५ ने प्रकरण दाखल असून दि.२२-०९-२०२५ ला तक्रारदार सखाराम कुलकर्णी न्यायालयात हजर झाले व न्यायालयाने पुढील चुनावणी दोन आठवड्यावर ठेवली. न्यायालयात काय निर्णय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागूनआहे. तसेच झालेल्या नियुक्त्या बोगस असल्याचे उघड होते का हे ओपाहावे लागेल. त्यामुळे गैर नियुक्त्या व गैर पदोन्नत्या मिळालेल्या कर्मचाऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले.








