अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
कल्याण-डोंबिवलीतील ६५ इमारतींचा प्रश्न न्यायाच्या लढ्यातील महत्त्वाची बैठक पार पाडली
प्रतिनिधी मुकुंद मोरे
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ६५ इमारतींना अनधिकृत ठरविण्यात आलं असून, त्यामध्ये राहणाऱ्या हजारो कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आलेली आहे. या रहिवाशांची फसवणूक ही विकासकांनी केली असून, गुन्हेगार मात्र मोकाट आहेत – आणि शिक्षेची टांगती तलवार लटकतेय सामान्य जनतेच्या डोक्यावर
आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदेच्या अध्यक्षतेखाली यावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीतील ठळक निर्णय आणि मुद्दे:
रहिवाशांना न्यायालयीन आदेशांच्या अधीन राहून दिलासा देण्याबाबत सविस्तर चर्चा
फसवणूक करणाऱ्या विकासकांवर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेद्वारे जलद तपास व गुन्हे दाखल करण्याचे आदेश
रहिवाशांनी हाउसिंग सोसायटी स्थापन करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून जमीन हस्तांतरण शक्य होईल
महापालिकेच्या संकेतस्थळावर अधिकृत इमारतींची यादी नियमित प्रसिद्ध करणे व जनजागृतीसाठी फलक लावणे
निव्वळ कारवाई नव्हे, तर जनतेच्या हक्काचे संरक्षण हवे!
उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले – गुन्हेगारांना शिक्षा आ








