अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची आणि सुरुवात
जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरीचे तोतया व स्वयंम घोषित अध्यक्ष शिवाजी जाधव यांच्या कळसुत्रीपणामुळे शेकडो शिक्षक सणासुदीत वेतनापासून वंचित
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सखाराम कुलकर्णी
नांदेड- जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी ता. मुखेड संस्थेचा सन २०१५ ते २० चा फेरफार बदल अर्ज (चेंज रिपोर्ट) रद्द झाल्यामुळे संस्थेत कोणतीच कार्यकारणी अस्तित्वात नसून अध्यक्ष कोणीही नाही. पण स्वयंम घोषित तोतया अध्यक्ष शिवाजी नागोराव जाधव यांच्या कळसूत्री पणामुळे तिन्ही शाळेचे जवळपास दीडशे कर्मचारी सणासुदीच्या काळात वेतनापासून वंचित राहात असल्यामुळे, आमच्या वेतनाची व्यवस्था करा अशी मागणी शिक्षणाधिकाऱ्याकडे कर्मचाऱ्यातून होत असताना दिसत आहे.
विविध आरोप प्रत्यारोपाने वादाच्या चर्चेत असलेली जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी ता. मुखेड संस्थेच्या नांदेड जिल्ह्यात नरसिंह विद्यामंदिर उमरदरी, शिवाजी विद्यालय सिडको नांदेड व नरसिंह विद्यामंदिर नांदेड या तीन शाळा कार्यरत असून या शाळेत जवळपास १५० कर्मचारी कार्यरत आहेत. दसरा दिवाळी या सणासुदीच्या काळात या शाळेतील १५० कर्मचारी स्वयंम घोषित तोतया अध्यक्ष शिवाजी नागोराव जाधव व त्यांचा मुलगा स्वयंघोषित उपाध्यक्ष तथा शिवाजी विद्यालय सिडको चे उपमुख्याध्यापक पदावर नियमबाह्य विराजमान झालेले रवी शिवाजीराव जाधव यांच्या कळसुत्रीपणामुळे वेतना पासून वंचित राहत आहेत. ते असे की संस्थेच्या अध्यक्ष पदावर असताना मुख्याध्यापक नियुक्तीसाठी यांची अशी अट असतेकी मुख्याध्यापक यांचे खेळणे असावे व सह्याजीराव असावेत. तसेच दावणीला बांधलेले असावे, त्यामुळे शिवाजी विद्यालय सिडको येथे देवरे, नरसिंह विद्या मंदिर नांदेड येथे गव्हाणे यांना तर नरसिंह विद्यामंदिर उमरदरी येथे ओमप्रकाश कल्याणकर यांना प्रभारी मुख्याध्यापक नियुक्त करून शिक्षणाधिकारी यांचे मान्यता घेतल्या या तीन मुख्याध्यापकात देवरे व गव्हाणे यांचा कार्यकाळ 31 ऑगस्टला संपला व नरसिंह विद्यामंदिर उमरदरी चे मुख्याध्यापक ओमप्रकाश कल्याणकर शिवाजी जाधव यांचे गैरकामे ऐकत नसल्यामुळे शिवाजी जाधव व त्यांच्या चमूने शिक्षणाधिकारी नांदेड यांचेकडे कल्याणकर यांच्याविरुद्ध खोट्या तक्रारी करून शिक्षणाधिकारी यांच्याशी संगणमत करून त्यांना पदावरून हटवले व तेथे संस्थेचे लेटर पॅड वापरून गौड यांचे बनावट नियुक्तीपत्र तयार करून त्यावर तोतया अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी सही करून नियुक्ती केली .त्याला शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता नाही व इतर दोन्हीही शाळेचे मुख्याध्यापकांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्या शाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर शैक्षणिक कामे थांबली. आता या तोतयाअध्यक्ष शिवाजी जाधव यांनी नियुक्त केलेल्या मुख्याध्यापकांच्या नावास शिक्षणाधिकारी मान्यता देतात का? किंवा संस्थेवर गेली दहा वर्षापासून कार्यकारणी नसल्यामुळे खोटी काम होत असून ते थांबवण्यास प्रशासक नियुक्त करून नियमानुसार मुख्याध्यापक नेमतात का याकडे या तिन्ही शाळेतील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे








