कारवाई पासून मुक्त व्हा, प्रशासनाला सहकार्य करा ! गणेशोत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि महसूल प्रशासन सज्ज… संभाजी पुरीगोसावी सातारकर…!!
संगीता इंनकर सातारा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्रांत सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम चांगलीच सुरू झाली आहे. आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि महसूल प्रशासन देखील आपापल्या जिल्ह्यामध्ये सज्ज झाले आहे. तरी सर्व जनतेने व सर्व मंडळाच्या अध्यक्ष पदाधिकारी तसेच सर्व कार्यकर्ते यांनी आगामी सण गणेशोत्सव, नवरात्र उत्सव पोलीस प्रशासनाला सहकार्य करून आनंदात गणेश उत्सव साजरा करावा. प्रशासनाकडून जे आपणांस निर्बंध घालून दिले आहेत त्या निर्बंधाचे पालन नक्कीच करावे, आणि कारवाई पासून आपण मुक्त व्हाल असा उत्सव सर्वांनी साजरा करावा असे आव्हान रोखठोक महाराष्ट्र ग्रुप कडूंन करण्यात आले आहे. आगामी सण उत्सवांच्या काळात कुठेही अनुचित प्रकार घडू नये या करिता आपल्याच सुरक्षिततेसाठी त्या अनुषंगाने पोलीस आणि महसूल यंत्रणादेखील गेल्या पंधरा दिवसांपासून आगामी सणासुदीच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सज्ज झाले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करून सण उत्सव साजरे करावेत.









