चौसाळा ते पालसिंगन रस्तयावर खड्डयाचे माहेर घर-विवेक कुचेकर
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
(चौसाळा प्रतिनिधी )बीड विवेक कुचेकर
तालुक्यातील चौसाळा ते पालसिंगन रस्तयावर खड्डयाचे माहेर घर झाले असुन ठिकठिकाणी खड्डे पाहायला मिळत असुन या रस्तयावरील खड्डे तात्काळ बुजवुन या रस्तयावरील अपघाताची मालिका थांबवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांनी केली आहे. सध्या पावसाळयाचे दिवस सुरू असुन या रस्तयावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्डयात पावसाचे पाणी साचत असल्यामुळे दुचाकी चालकाचे अनेक छोटे मोठे अपघात याठिकाणी झालेले आहेत.
या रस्तयाच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर करण्यात यावे व याठिकाणी होणारया अपघाताची मालिका थांबवावी अशी मागणी होत असुन या रस्तयाच्या दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनाचे ही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांनी केला असुन तात्काळ या रस्तयाची दुरूस्ती करण्यात यावी अन्यथा सार्वजनिक बाधकाम विभागाच्या विरोधात ञिव स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा ईशाराही कुचेकर यांनी दिला आहे
