वरखेडी येथे वादळी वाऱ्या सह घरांचे पत्र उडाले तर पाऊसाने मोठ्या प्रमाणात झोडपले
घराचे पत्रे – उड्याल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
एरंडोल – तालुक्यातील वरखेडी गावांत बुधवारी रात्री वादळी वाऱ्या सह पावसामुळे मोठे प्रमाणात नुकसान झाले असुन अनेकांच्या घरांची पत्रे उडाले, तर वृक्ष उन्मळून पड़ल्याने घरांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही . बुधवारी रात्री वादळी.
वाऱ्यासह विजांचा कडकडाटात आलेल्या पावसाने तालुक्यातील वरखेडी येथील भावलाल पाटील, याच्या घरांचे पत्र उडाल्याने घरातील कडधान्य पावसात भिजल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
गावांमध्ये वादळी वारासह मोठ्या प्रमाणात घरांचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे.
रामलीला
पाटील यांच्या शेतातील गोठ्याचे पूर्णपणे नुकसान होऊन त्यात चारा पुर्णपणे भिजल्या ने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . रात्रीपासून विद्युत वितारण कंपनीचे पोल व झाडे पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले वीजप्रवाह सुरळीत करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे मात्र अद्यापही वीज आलेली नसुन तिन दिवसा पासून गावात वीज पुरवठा खंडित झाला आहे.तो पुन्हा कधी सुरळीत होनार.
