चौसाळा ते साञापोञा बससेवा तात्काळ सुरु करा अन्यथा बीड आगारामध्ये विद्यार्थ्यांना सोबत घेऊन शाळा भरवणार सचिन आगलावे
(चौसाळा प्रतिनिधी) विवेक कुचेकर
चौसाळा ते साञापोञा मार्गे बससेवा तात्काळ सुरू करण्यात यावी अन्यथा विद्यार्थ्यांना सोबत घेऊन बीड आगारामध्ये शाळा भरवण्याचा इशारा भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी बीड जिल्हा सहसचिव सचिन आगलावे यांनी बीड आगार प्रमुखांना दिला आहे
अनेक विद्यार्थी हे चौसाळा येथे शिक्षणासाठी येत असतात परंतु या ठिकाणी बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे या परिसरातील साञा पोञा,देवी बाबळगाव, अंधापुरी, सावरगाव, येथील बरेचसे विद्यार्थी हे चौसाळा येथे शिक्षणासाठी जात असतात या मार्गे कुठलीही बस सेवा नसल्यामुळे विद्यार्थी व पालकांना खूप मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याकारणाने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे तरी बीड आगार प्रमुखांनी या प्रमुख मागणीकडे लक्ष देऊन चौसाळा ते साञा पोञा बससेवा चालु करावी अन्यथा दिनांक 15/06/2025रोजी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन बीड आगारामध्ये शाळा भरविण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी बीड आगार प्रमुखाची राहील असा इशारा भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी बीड जिल्हा सहसचिव सचिन आगलावे यांनी दिला आहे.
