संपादकीय दिनांक 18 मे 2025 रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथून मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशनचा संपर्क क्रमांक घेऊन दिव्यांग क्षेत्रात कार्य करणारी cso ngo चे मुंबईच्या मुस्कान शर्मा यांनी मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांना संपर्क केला.दिव्यांगांच्या प्रश्नावर चर्चा करताना मधु ताराच्या कार्याचं विस्तारिओ रूप त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पायात अस्थिव्यंग दिव्यांग असलेले श्री मनजीत सिंह राहणार पंजाब सध्या दिल्ली यांना जॉब हवा आहे असे सांगितले.मधु तारा प्रमुख यांनी माझा नंबर त्यांना ध्या असे सांगितल्यावर श्री मनजीत सिंह यांनी संपर्क साधला त्यांना जॉबची गरज आहे अस लक्षात आल्यावर पुण्यातील दिव्यांगाना रोजगार स्वयंरोजगार देणारी कृषी गौरव फाऊंडेशनचे श्री प्रताप सिंह यांच्या मार्फत पुणे येथे त्यांना प्रशिक्षणानंतर टेली कॉलिंगचा जॉब आणि नंतर वर्क फ्रॉम होम अस रोजगाराच नियोजन मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री नितीनजी शिंदे यांनी लावून दिले.
या वेळी मधु तारा फाऊंडेशनचे आभार श्री मनजीत सिंह यांनी मानत खूपच छान प्रतिसादासह अशी झटपट दिव्यांगना सेवा मधु तारा करीत आहे या बद्दल आनंद व्यक्त केला.आणि मधु तारा प्रमुखांसोबत बोलून आपल कोणीतरी असल्याची भावना व्यक्त केली.
Cso Ngo चे मुस्कान शर्मा यांनी पहिल्यांदाच बोलून श्री मनजीत सिंह यांना जॉब उपलब्ध करून दिल्या बद्दल मधु ताराच्या कार्याचं अभिनंदन केले व नेहमी सोबत राहून दिव्यांगांसाठी* *राज्यातच नाहीतर देश पातळीवर कार्य करत राहू असे फोन करून म्हटले.
