प्रतिनिधी: संतोष लांडे | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज
बिबवेवाडी (पुणे ):गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीना आज दिनांक 22 मे 2025 रोजी बिबवेवाडी पोलिसांनी केली अटक सदरबाबत अधिक माहिती अशी की, “दिनांक १८/०५/२०२५ रोजी ०२.१५ वा. ते ०२.३० वा. सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या मागे हनुमान मित्र मंडळ चौकामध्ये अप्पर बिबवेवाडी पुणे येथे फिर्यादी यांचे दाजी उमेश जालिंदर शिंदे व गणेश सुर्यवंशी यांनी अक्षय भालके याच्या विरुध्द डायल ११२ वय पोलीसांना केलेल्या तक्रारीचा राग मनात धरून इसम बाळा गाडे, सनी शिंदे, बाब्या पंधेकर, गणेश भालके, बंटी म्हस्के व देवा डोलारे यांनी मिळून फिर्यादी यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून लाथाबुक्यांनी व काठीने मारहाण केली तसेच बाळा गाडे याने त्याचेकडील पिस्टलने फिर्यादी यांचे दिशेने फायर करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून फिर्यादी यांनी बाळा गाडे, सनी शिंदे, बाब्या पंचेकर, गणेश भालके, बंटी म्हस्के, अक्षय भालके व देवा डोलारे यांचेविरुध्द दिली असता बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. १०९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९,११५ (२), १८९(२). १८२(४), १९१(२), १९१(३),१९०, आर्म अॅक्ट ३ (२५).४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल आहे.”
दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेबाबत मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ राजकुमार शिंदे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे, यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे साो. व मा.पोलीस निरीक्षक सुरज बेंद्रे साो (गुन्हे) यांनी दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेबाबत तपास पथकाचे प्रभारी पोउनिरी अशोक येवले व अंमलदार यांना सुचना केले.
त्यावरुन दाखल गुन्ह्यातील आरोपी रेकॉर्डवरील व चलाख वृत्तीचे गुन्हेगार असल्याने ते पोलीसांचे डावपेच ओळखून होते. आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार प्रणय पाटील, आशिष गायकवाड, सुमित ताकपेरे, शिवाजी येवले, विशाल जाधव यांना त्यांचे बातमिदारामार्फत बातमी मिळाली की, सनी शिंदे, बाब्या पंधेकर, बंटी म्हस्के, अक्षय भालके, गणेश भालके हे चैत्रबन वसाहत येथे एका पडक्या घरामध्ये लपून बसलेबाबत खात्रिशिर बातमी मिळाली. त्यानुसार तपास पथकाने घेरा घालून त्यांना ताब्यात घेतले. तसेच गुन्हे शाखा युनिट ६ चे सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, व त्यांचे स्टाफ यांनी देवा डोलारे यास बोपदेव घाट येथून ताब्यात घेवून अटक केली असून पुढील तपास करत आहोत. सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ राजकुमार शिंदे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे, यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे सो. व मा.पोलीस निरीक्षक सुरज बेंद्रे साो (गुन्हे), पोउनिरी अशोक येवले, पो. हवा. गायकवाड, पो. अं.प्रणय पाटील, सुमित ताकपेरे, आशिष गायकवाड, शिवाजी येवले, विशाल जाधव, ज्योतिष काळे, रक्षित काळे, वत्ता शेंद्रे, शिवाजी येवले यांनी केली आहे.
