अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी गणेश दळवी
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष अंकुश बाबा कदम आणि सरचिटणीस धनंजय जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य पक्षाच्या मुंबई विभागाच्या युवक अध्यक्षपदी संतोष कदम निवडण्यात आले
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांच्या विचारातून चालणारे श्री,संतोष कदम भाऊ ह्यांना अंकुशबाबा कदम, सरचिटणीस धनंजय जाधव यांच्या हस्ते त्यांची निवड करण्यात आली आहे.ही नियुक्ती आपल्या मुंबई, ठाणे,रायगड आणि पालघर एवढे जिल्हा वर नियुक्ती करण्यात आली तसेच त्यांची पक्षाच्या स्वराज्य भवन पुणे कार्यालयात त्यांना निवडपत्र देण्यात आले. छावा युवा प्रदेश कार्याध्यक्ष पदावर काम करत असताना संपूर्ण युवकांचे जाळे निर्माण केले
पक्षाची पक्षायधोरणे समाजाच्या तळगाळात पोहचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून अधिकाधिक युवा तरुण पिढी पक्षाच्या प्रवाहात आणत संघटनात्मक बांधणी कशी मजबूत करता येईल असा विश्वास तरुण पिढी यांना दिला. स्वराज्याचे सक्रिय कार्यकर्ता म्हणून पाऊल ओळखणे आहे. पक्षांचा प्रत्येक कार्यक्रम त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
त्यांचे कार्य पाहून पक्षाच्या नेत्यांनी त्याची अधिकृत नियुक्ती केली आणि पक्षाने थेट मुंबई विभागाच्या युवक अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या निवडीसाठी सर्व स्तरावर स्वागत होत आहे.
