प्रतिनिधी : सतिश कडु | अजिंक्य महाराष्ट्र.
आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते तसेच गोल्डमॅन रोहित पिसाळ यांची नारा पार्कवरील उपोषणस्थळी भेट.
223 दिवसांचे उपोषण सुरूच ! जोपर्यंत न्याय मिळणार नाही ! तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही : अध्यक्ष चंदू पाटील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनेशनल पार्क बचाव कृति समिति च्यावतीने 12 मे 2025 रोजी, तथागत बुद्ध जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनेशनल पार्क नारा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व उपासक आणि उपसिका लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देता यावी यासाठी मुंबई येथून 5 किलो सोन्याच्या विटेवर कोरलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो नारा पार्कवर उपलब्ध करण्यात आला होता. समितिचे अध्यक्ष चंदू पाटिल आणि सर्व सदस्य शशिकला चालखुरे, यमुनाबाई रामटेके, विजयाताई पाटिल, वनिता वालदे, अल्का रक्षित, बेबिताई गजभिये, राजेश रंगारी, सुषमा काम्बाले, आनंद रक्षित, सुनीता सांगोले, पंचशीला गजभिये, आनंद वाघमारे, हेमंत वाहने, आशा दाहाट, जयश्री सोमकुंवर, विद्याधर बागड़े, योगेंद्र शेंडे, बोनी वालदे, पुरुषोत्तम भांगे, मधुकर जनबंधु, प्रफुल खोब्रागाड़े, रवि चौहान, रंजीत फुले, मुस्ताक पठान, मिथिलेश पाटिल, नंदू डोंगरे, प्रशांत रामटेके, राजकुमार मेश्राम, गौतम रंगारी, शिला फुले, राजेश शेलार, विजय दाहाट, मीनाक्षी वालदे, विलास शेवाले, द्वारा कार्यक्रम व्यवस्थित होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. बुद्ध जयंतीच्या दिवशी बुद्ध वंदना झाल्यावर सुमधुर भीम गीतांचा आर्केस्ट्रा ठेवण्यात आला होता. 223 वा दिवशीचे उपोषण सोडविण्यासाठी मुंबईतील गोल्ड मैन च्या नावाने प्रसिद्ध असलेले आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते रोहित पिसाळ यांच्या हस्ते उपोषण सोडविल्यानंतर 5 वाजता त्रिशरण झेंडा डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनेशनल पार्क येथे रोहित पिसाळ यांच्या हस्ते लावण्यात आला व त्यानंतर लगेच खीर पूरी चे वितरण केले गेले.
