पाकिस्तानचा माज उतरवण्याची हीच खरी वेळ, भारतीय सैन्य पाकिस्तानला नक्की धडा शिकवेल
माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर
प्रतिनिधी. नामदेव मंडपे मंठा जालना
*पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय सैन्यावर देशभक्त भारतीयांचा १००% विश्वास -आमदार लोणीकर*
===========🪷==========
भारताचा स्वर्ग म्हणून संबोधल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीर मधील पहलगाम या ठिकाणी पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांकडून काल भीषण दहशतवादी हल्ला करण्यात आला. उन्हाळी सुट्टयांचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. जम्मू-काश्मीरमधील अलीकडच्या काळात झालेला हा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला आहे. २६ पर्यटकांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. पहलगाम हे काश्मीरमधील पर्यटन स्थळ आहे. इथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. काल दुपारी इथे मोठ्या संख्येने पर्यटक असताना हा दहशतवादी हल्ला झाला. पहलगामच्या सौंदर्याला काल रक्तरंजित करण्यात आलं.
देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी गृहमंत्री श्री अमित भाई शहा यांनी याबाबत कठोर भूमिका घेऊन पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. भारत सरकारच्या वतीने भारतीय सैन्याला आपले निर्णय स्वतः घेण्याची पूर्ण मुभा दिलेली आहेच परंतु याहीपेक्षा कठोरातील कठोर भूमिका घेऊन अतिरेक्यांना आणि अतिरेक्यांना आणि पाकिस्तानला अद्दल घडवण्याची हीच वेळ आहे. भारत सर्व दृष्टिकोनातून सक्षम असून या अतिरेकी हल्ल्याचा भारताकडून नक्कीच सर्जिकल स्ट्राइक सारखे उत्तर मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय सैन्यावर देशभक्त भारतीयांचा १००% विश्वास आहे.
