अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात.
सौ. कलावती गवळी कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी आँचल दलाल डुडी मॅडम यांची पुरीगोसावी यांनी घेतली सदिंच्छा भेट, सौ. कलावती गवळी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी. कर्तव्यदक्ष आणि डॅशिंग आयपीएस अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आँचल दलाल डुडी मॅडम यांचे पुणे येथील राज्य राखीव पोलीस बल समादेशक कार्यालयात गुरुवारी दुपारी जयहिंद नमस्कार मॅडम असे म्हणत पुरीगोसावीं नी सदिच्छा भेट घेतली यावेळी आँचल दलाल डुडी मॅडम यांना सातारा जिल्ह्याची आठवण झाली, त्यांनी सातारा जिल्ह्यामध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक तसेच अप्पर पोलीस अधीक्षक तर सांगलीत देखील अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांचा कार्यकाल अतिशय उत्कृंष्ट आणि दमदार ठरला, 13 ऑगस्ट 2024 रोजी त्यांची सातारा अप्पर पोलीस अधीक्षक पदावरून पुणे येथील राज्य राखीव पोलीस बल समादेशक पदी नियुक्ती झाली आहे, महाराष्ट्र पोलीस खात्यात त्यांना कर्तव्यदक्ष आणि डॅशिंग आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जाते, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या त्या पत्नी आहेत, तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या त्या बहिण आहेत. सध्या पती-पत्नी आणि भाऊ पुणे जिल्ह्यात कार्यरत आहेत.
