सद्गुगुरू संत सेवालाल महाराज २८६ वी जयंती कात्रज सच्यामाता मंदिर भागात मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.
प्रतिनिधी गोपाळ भालेराव
बंजारा समाजाचे आराध्य दैवत सदगुरु संत सेवालाल महाराजांची 286 वि जयंती सच्यामाता , मंदिर पाणी टाकी , वाघजाई नगर या भागातील गोर बंजारा बंधू व भगिनी समाज्याच्या वतीने मिळून सेवालाल महाराज की जयच्या घोषणा देत व पारंपरिक वेशभूषा परिधान करून कला नृत्य सादर करत भोसले गार्डन येथे जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमुख मान्यवर अँड .रमेश खेमु राठोड, युवा सामाजिक कार्यकर्ते भावी नगरसेवक स्वराज (भैय्या) नमेश बाबर, प्रशांत कांबळे आम आदमी पक्षाचे सामाजिक न्याय विभाग पुणे शहर अध्यक्ष,सागर धमो राठोड राष्ट्रीय बंजारा परिषद पुणे शहर अध्यक्ष, लालू फुलसिंग झरपला राष्ट्रीय बंजारा परिषद पुणे शहर सचिव, कांताभाऊ राठोड पत्रकार, झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष, संदीप भाऊ जाधव राष्ट्रीय बंजारा परिषद पुणे शहर, रमेश जाधव, रमेश राठोड, शंकर चव्हाण, गोपाळ चव्हाण,किसन राठोड, शंकर पवार,भिमा भाऊ तसेच सामाजिक कार्यकर्ते व इतर पदाधिकारी गोरं बंजारा बांधव व भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बंजारा समाजातील बांधवांना मार्गदर्शन व संत सेवालाल महाराजांची शिकवण, संदेश
समाजासाठी केलेल्या कार्याची कामाची माहिती देण्यात आली.
बंजारा समाजाची प्रगती ,उन्नती शिक्षण,या गोष्टीवर भर कसे देता येईल या दृष्टीने विचार करायला हवा तरच बंजारा समाज सुधारेल व प्रगती करेल हा उपदेश देण्यात आला.
