अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
कोंढवे धावडे :- आदर्श बहुउद्दिय सामाजिक संस्थाचे हॅलो किड्स स्कूल कोंढवे धावडे पुणे- २३ शाळेचे वार्षिक क्रीडा स्पर्धा २०२४ – २०२५ स्पोर्टजीला घेण्यात आले. वार्षिक क्रीडा स्पर्धेची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आले. सरस्वती पूजन साहित्यरत्न डॉ.श्री. गणेश विठ्ठल राऊत महा. प्रदेश प्रवक्ता अखिल भारतीय छावा संघटना व संस्थेचे अध्यक्ष श्री.अशोक बबन साळुंके यांच्या शुभहस्ते करत स्पोर्टजिला सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत तात्या धावडे विशालदादा मानकर व श्री. माधव क्षेत्री व इतर पालक वर्ग उपस्थित होता.
स्पर्धेत मुलांचे वेगवेगळे खेळ व स्पर्धे धावणे ,लिंबू चमचा, बेडूक उड्या, बुक बॅलेन्स या स्पर्ध घेण्यात आल्या. तसेच पालकांच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या. मुलांना व पालकांना खूप आनंद झाला. स्पर्धेत नंबर आलेल्या मुलांना व पालकांना बक्षीसे देण्यात आली. अशा प्रकारे क्रीडा स्पर्धेची सांगता झाली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शिक्षकांनी खूप मेहनत घेतले.
या स्पर्धेचे आयोजन व मार्गदर्शन सौ. सुवर्णा साळुंके (मुख्याध्यापिका) यांनी केली.