अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
संभाजी पुरीगोसावी सातारा शहर पोलीस ठाणेतील जय गोसावी यांची पोलीस हवालदार पदी पदोन्नती, सातारा जिल्हा पोलीस दलातून अभिनंदन यांचा वर्षाव, संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. सातारा शहर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले जय यशवंत गोसावी यांची नुकतीच पोलीस हवालदार पदी पदोन्नती झाल्याने सातारा शहर पोलीस ठाणेतील प्रभारी अधिकाऱ्यांसह जिल्हा पोलिस दलातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे, पोलीस हवालदार जय गोसावी मूळचे सातारा जिल्ह्यातील फलटणचे रहिवासी आहेत. त्यांनी आत्तापर्यंत ठाणे शहर पोलीस ठाणे, उल्हासनगर पोलीस ठाणे,महात्मा फुले चौक पोलीस ठाणे, कल्याण आणि सध्या सातारा शहर पोलीस ठाणेत ते नेमणुकीस आहेत. अत्यंत शांत स्वयंमी प्रेमळ स्वभाव, आणि कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार म्हणून जय गोसावी यांची पोलीस खात्यात ओळख आहे, नुकतीच त्यांची पोलिस हवालदार पदी पदोन्नती झाल्याने सातारा शहर पोलीस ठाणेतील प्रभारी अधिकारी राजेंद्र मस्के स.पो.नि. एन.जी. केनेकर अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील त्यांचे शहर पोलीस ठाणेत स्वागत करीत अभिनंदन केले, त्यांच्या या पदोन्नतीबद्दल सातारा जिल्हा पोलीस दलातून देखील अभिनंदनचा वर्षाव होत आहे, तसेच पोलीस हवालदार जय गोसावी यांचे समस्त पुरीगोसावी परिवाराकडूंन आणि रोखठोक महाराष्ट्र ग्रुप तसेच आम्ही सातारकर या ग्रुप कडून देखील मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालींस शुभेच्छा आहेत.
