अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
प्रतिनिधी : समाधान पाटील – मराठी पत्रकारितेचे आद्य जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्ताने पत्रकार दिन सिम्बॉल ऑफ नॉलेज या सामाजिक संस्थेमार्फत काँग्रेस भवन निफाड येथे पत्रकारांना आमंत्रित करून सायंकाळी सहा वाजता पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सहा जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो त्याचे औचित्य साधून संस्थेचे अध्यक्ष राकेश निकाळे व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राकेश निकाळे व सर्व पदाधिकारी तसेच पत्रकार राजेंद्रजी थोरात, माणिक देसाई, देविदास बैरागी, राहुल कुलकर्णी, सुनील कुमावत, मुकुंद आव्हाड, प्रदीप कापसे, किशोर सोमवंशी, योगेश कर्डिले, विनोद गायकवाड इत्यादी पत्रकारांचा
सिम्बॉल ऑफ नॉलेज बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
या वेळी संस्थेचे खजिनदार विनोद गायकवाड यांनी सिम्बॉल ऑफ नॉलेज ही संस्था कशा पद्धतीने कार्य करते तसेच या संस्थेचे उद्दिष्ट मांडण्यात आले, गरीब मुलांना शालेय शिक्षणात आर्थिक मदत करणे, अंध व अपंगांना आर्थिक व सामाजिक मदत करणे, निराधार वृद्धांना आश्रय देणे, वृक्षरोपण करणे पर्यावरणाची काळजी घेणे, महापुरुषांच्या विचाराने सामाजिक सेवा करणे, आश्रम शाळा किंवा शाळा वस्तीगृह येथे महापुरुषांच्या विचारांची शिक्षण देणे, समाजात सामाजिक प्रबोधन करणे व आजपर्यंत सिम्बॉल ऑफ नॉलेज या संस्थेने केलेले कार्य सांगण्यात आले.
याप्रसंगी पत्रकारांचे मनोगत व्यक्त करताना पत्रकार राजेंद्रजी थोरात, देविदास बैरागी, माणिक देसाई, मुकुंद आव्हाड, यांनी संस्थेच्या विषयी होणाऱ्या कार्याची दखल घेऊन पुढील होणारे सामाजिक कार्य आमच्या वृत्तपत्रात तसेच सर्व पत्रकार बांधवांना सांगून सिम्बॉल ऑफ नॉलेज या सामाजिक संस्थेच्या कार्याचा सर्व वृत्तपत्रात वृत्तलेखन करू असे सांगण्यात आले.
पत्रकार सन्मान यशस्वीतेसाठी सिम्बॉल ऑफ नॉलेज बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी तसेच संस्थापक अध्यक्ष राकेश निकाळे, उपाध्यक्ष दादाराव काऊतकर, सचिव प्रेमराज वाघ, खजिनदार विनोद गायकवाड, सहसचिव प्रवीण कोळी, सदस्य सुनील साळवे, विक्रम आढाव ,दादाराव पंडित उपस्थित होते सूत्रसंचालन विनोद गायकवाड यांनी केले व आभार राकेश निकाळे यांनी मानले.