अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
संपादकीय : कोथरूड – पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षण प्रसारक मंडळाच्या सौ. प्रतिभा पवार विद्यामंदिरमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आणि विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.
या वेळी प्रमुख पाहुणे महालक्ष्मी पवार, अतुल वाळंज, मुख्याध्यापक श्याम धुमाळ, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक वसंत सावंत आणि शिक्षक वृंद यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी इतर शाळांमधील पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंचे गौरव गीत गायिले. शुभांगी राऊत यांनी ‘मी सावित्री बोलते’ हे एकपात्री नाटक सादर केले. अदिती निकम हिने सावित्रीबाईंची वेशभूषा केली. संतोष पवार, शर्मिला खारतोडे यांनी सावित्रीबाईंचे कार्य या विषयावर तयार केलेल्या ‘प्रतिभा दर्पण’ चे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
पहिली ते सातवी आंतरशालेय चित्रकला स्पर्धेमध्ये परिसरातील दहा शाळांनी सहभाग घेतला. यात लहान गटासाठी चित्र रंगभरण आणि मध्यम व मोठ्या गटासाठी सावित्रीबाईंच्या जीवनावरील आधारित प्रसंगचित्र रेखाटन विषय होते. यामध्ये मोठ्या गटात प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ क्रमांक अनुक्रमे वैष्णवी गायकवाड, योगिता सूर्यवंशी, करण जोगळे, सिद्धांत मराठे, आशिष साठे, अमेय साठे यांचा आला. मध्यम गटात गटात मल्हार दातार, आरोही शर्मा, स्वराली व्यवहारे, शौर्य शेळके, सुरेश जयस्वाल , तर लहान गटात ओवी पड्याळ ओवी शर्मा, देविका वीर, स्वरा पाटोळे, वंश पवार यांचा क्रमांक आला. विजेत्या विद्यार्थ्यांना ट्राॅफी, मेडल आणि सावित्रीबाईंचे पुस्तक देण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन सुनीता ढुमे, मनीषा नवले यांनी केले. नारायण शिंदे यांनी आभार मानले.
