एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

सोन्याचे दागिने चोरणाऱ्या नोकराला राजारामपुरी पोलिसांनी ठोकल्या बेड्या, 8,75,000 रुपयांचे दागिने पोलिसांनी केले हस्तगत,

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात…!

प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी. कोल्हापुरात परदेशी सहलीसाठी गेलेल्या सेवानिवृत्त जीएसटी उपायुक्तांच्या घरातील 12 तोळे दागिने चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डुबलीकेट चावी चा वापर करून त्याने चोरी झाल्याने तसेच माहितगारांचे हे काम असल्याचा संशय पोलिसांना होता. महिन्याभरांपूर्वी घरगडी म्हणून आलेल्या कामगारांनेच ही चोरी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी निखिल राजू पाटील (वय 25) रा. विक्रमनगर) याला राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फिर्यादी शिरीष शंकरराव कुंदे (वय 65) रा. जवाहरनगर) 26 नोव्हेंबर पासून सहलीनिमिंत्त परदेशात गेले होते. घरी परतल्यानंतर त्यांच्या बेडरूम मध्ये असलेल्या कपाटापैकी एका कपाटातील दागिने गायब झाल्याचे आढळून आले, दागिन्यांची घरात शोधाशोध करूनही दागिने मिळत नसल्याने त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती यामध्ये त्यांनी साडेचार तोळ्याची तीन मंगळसूत्रे अडीच तोळ्याच्या कानातील रिंगा झुबे तीन तोळ्याची सोनसाखळी लॉकेट अडीच तोडे वजनाच्या अंगठ्या असा सुमारे 8 लाख 75 हजारांचा ऐवज चोरीस गेल्याचे तक्रारीत नमूद केले होते, काही दिवसांपूर्वी कुंदे यांच्या घरांतील कपाटाची एक चावी हरवली होती. त्या चावीचा वापर या चोरीसाठी झाल्याचा अंदाज पोलिसांनी काढला होता. निखिल पाटील हा महिन्याभरांपासून कुंदे यांच्याकडे घरकाम करीत होता. त्याच्या कामामुळे त्याच्यावर कुंदे यांचा विश्वास बसला होता. घरांतील चाव्यांची माहितीही निखिल यालाच चांगलीच होती. त्यामुळे पोलिसांना घर गड्याचा संशय चांगलाच आला. चौकशीसाठी त्याला ताब्यांत घेतले सुरुवातीला त्यानेही उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र नंतर त्याने चोरीची कुबली दिली. त्याच्याजवळून काही दागिने पोलिसांनी हस्तगत देखील केली आहेत.अधिक तपास पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण करीत आहेत.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link