एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

छत्रपती शिवाजी महाराज व गुरू गोविंद सिंह या दोन महापुरुषांचे “सनातन संस्कृतिच्या, रक्षणासाठी सर्वात मोठे योगदान ! – श्री अश्विनी कुमार उपाध्याय (दिल्ली) अधिवक्ता सुप्रीम कोर्ट.

हिन्दू स्वाभिमान प्रतिष्ठान | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : हंसराज पाटील.

हिन्दू स्वाभिमान प्रतिष्ठान आयोजित रौप्यमहोत्सवी वर्षे अणि विजया दशमीच्या निमित्ताने ” एक भारत-श्रेष्ठ भारत, या विषयावर व्याख्यान दिनांक 06 ऑक्टोबर रोजी प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे संपन्न झाले.
या कार्यक्रमात आपल्या ओजस्वी वाणीने, सध्याच्या परिस्थितीची अश्विनीजीनी मांडणी केली या मध्ये प्रामुख्याने भारतात सध्या घुसखोरी, दलाली, भ्रष्टाचार, धर्मांतरण, लवजिहाद,अश्लीलता यांना रोखण्यासाठी कठोर कायदे. अस्तित्वात नाहीत त्यामुळे उन्माद सुरू आहे. या वर सरकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे भविष्यात बांग्लादेश सारखी परिस्थिती उद्भवली तर काय होईल, याची कल्पनाच न केलेली बरी. पूर्वीच्या घडीला महाराष्ट्र व पंजाब हि दोन राज्य सनातन संस्कृतिच्या रक्षणासाठी केंव्हाही सज्ज आसायची पण अंतरराष्ट्रीय षड्यंत्रद्वारे पंजाब राज्याला नशाखो री, धर्मांतरण च्या दलदली मध्ये उध्वस्त केले गेले.
महाराष्ट्रात घुसखोरी, बॉलीवूड द्वारे अश्लीलता हिंदूंच्या घरा- घरा पर्यंत पोहोचली, जाति-पातीच्या राजकारणात, महाराष्ट्रात सुद्धा सनातन संस्कृतिला , खिंडार पाडण्यात आले.
हि परिस्थिती बदलण्यासाठी सर्व हिन्दू जात पात विसरून एकत्र आले पाहिजे,
आपल्या पुढच्या पिढीला सुरक्षित करण्यासाठी, कठोर कायदे करण्यासाठी, सरकारवरील दबाव वाढवला पाहिजे, त्यासाठी स्थानिक आमदार, खासदार यांना जाऊन भेटले पाहिजे, तुम्ही कठोर कायदे करणार असाल तरच आम्ही तुम्हाला मतदान करू अन्यथा नाही असे बजावून सांगितले पाहिजे. तेंव्हा ते काहीतरी हालचाल करतील. अश्या मुद्देसूद विषयावर आपले मत व्यक्त केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे डॉ.संजय उपाध्ये, समस्त हिंदू आघाडी, गौरक्षादल प्रमुख पुणे श्री मिलिंद भाऊ एकबोटे,
निमंत्रक राजाभाऊ गोलांडे, सुहास पोफळे ,उत्तम दांडिले ,कैलाश बारणे, दत्ता सुर्यवंशी, अतुल आचार्य, दिगांबर रिद्धीवडे,दिलीप कुलकर्णी व विविध मान्यवर उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link